नाशिक – शहरात सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. गुरुवारच्या (१७ जून) लसीकरणाबाबत नाशिक महापालिकेने महत्त्वाची माहिती दिली आहे. गुरुवारी शहरात लसीकरण केंद्र बंद राहतील त्यामुळे नागरिकांना लस घेता येणार नाही. यापूर्वी रविवारी लसीकरण केंद्र बंद होते. मात्र, आता अचानक गुरुवारीही लसीकरण बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. मात्र, गुरुवारी केंद्र का बंद राहतील, याचे स्पष्टीकरण महापालिकेने दिलेले नाही. ज्यांनी स्लॉट बुक केलेले आहे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. दरम्यान, लसीच्या तुटवड्यामुळे केंद्र बंद राहणार असल्याचे वृत्त आहे.