India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

निफाड – रुई येथील महिला उपसरपंच व पतीवर सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे गुन्हा दाखल

India Darpan by India Darpan
July 28, 2022
in स्थानिक बातम्या
0

 

लासलगाव  ( इंडिया दर्पण वृत्तसेवा ) – निफाड तालुक्यातील रुई येथील महिला उपसरपंच व त्यांचे पती यांनी वीज वितरण कर्मचाऱ्यास मारहाण, शिवीगाळ केल्याप्रकरणी देवगावचे सहा.अभियंता दिनेशसिंग राजपूत यांच्या फिर्यादीवरून त्यांच्याविरोधात लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल आहे.

याबाबत देवगाव येथील सहा.अभियंता दिनेशसिंग राजपूत यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, रुई ग्रामपंचायतीकडे नळ पाणीपुरवठा योजनेचे तब्बल ५ लाख ३२ हजार ६५० रु. व २ लाख ५४ हजार २१० रुपये थकीत बिल असल्याने सदर ग्रामपंचायतला वारंवार कळवूनही ग्रामपंचायत बिल भरत नसल्याने आम्ही आमचे सोबत कर्मचारी धीरज वैभव जोशी, किरण नामदेव पानसरे, समाधान दगू तनपुरे असे आज दि. २७ जुलै २०२२ रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास ग्रामपंचातीच्या सार्वजनिक पाणीपुरवठा विहिर, कोळगाव रोड, कालव्याजवळ, रुई शिवार येथे जाऊन नळ योजनेचे वीज कनेक्शन सहकाऱ्यांमार्फत कट केले. सदर ठिकाणी गावातील उपसरपंच सविता केदारनाथ तासकर व त्यांचे पती केदारनाथ देवराम तासकर दोघे रुई ता.निफाड हे माझ्या जवळ आले व मला म्हणाले की, तुम्ही आमचे गावात येऊन पोलवर चढून वीज कनेक्शन का कट केले? अशी कुरापत काढून मला व माझ्या सहकाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी करून तुमचे तंगडे तोडतो असे बोलले. मी त्यांना समजावून सांगितले की, आम्ही वारंवार तुम्हाला सांगितले की वीज बिल भरून टाका तरी तुम्ही भरले नाही म्हणून आम्ही कारवाई केली आहे. त्यानंतर केदारनाथ तासकर आमचे वरिष्ठ उपकार्यकारी अभियंता सोनवने साहेब यांच्याशी फोनवर बोलले. सोनवणे साहेबांनी मला ते शुक्रवारी पैसे भरणार आहेत त्यांचे कट केलेले कनेक्शन पुन्हा जोडून द्या असे फोनवर सांगितल्याने मी सहकार्यांमार्फत तोडलेले कनेक्शन पुन्हा जोडून दिले. त्यानंतरही सविता केदारनाथ तासकर यांनी आम्हाला शिवीगाळ, दमदाटी करून माझे सहकारी धीरज वैभव जोशी यांचे कानामागे हाताचे चापटीने मारहाण केली. आम्ही तेथून निघून जात असताना केदारनाथ तासकर यांनी आमच्या गाडीला आडवे येऊन आम्हाला सदर ठिकाणावरून जाण्यास प्रतिबंध केला, तसेच तुम्ही पुन्हा कसे येता, पोलवर कसे चढता असे बोलून शिवीगाळ व दमदाटी केली आहे. तिथे उपस्थित असलेले भागवत नंदू वाघ यांनी केदारनाथ तासकर यांना बाजूला करून आम्हाला जाऊन दिले. म्हणून माझी वरील लोकांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणला अशी फिर्याद आहे. देवगाव येथील सहाय्यक अभियंता दिनेशसिंग राजपूत यांच्या लेखी फिर्यादीवरून संबंधितांविरुद्ध लासलगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर १४५/२२ भा.द.वि. कलम ३५३,३४१,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे दि.२७-७-२०२२,२३/१७ स्टेशन डायरी नं.१८/२२ अन्वये सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी लासलगावचे सहा.पो.निरीक्षक राहुल वाघ, पो.उपनिरीक्षक आदिनाथ कोठाळे, स.पो.उपनिरीक्षक लहानु धोक्रट, पोलीस नाईक संदीप शिंदे, पोलीस नाईक औदुंबर मुरडनर अधिक तपास करीत आहेत.


Previous Post

या व्यक्तींना आज मिळेल मनासारखा मेनू; जाणून घ्या शुक्रवार, २९ जुलैचे राशिभविष्य

Next Post

श्रावण महिन्यात या वेळेमध्ये सुरू राहणार त्र्यंबक मंदिर; असे आहे संपूर्ण नियोजन

Next Post

श्रावण महिन्यात या वेळेमध्ये सुरू राहणार त्र्यंबक मंदिर; असे आहे संपूर्ण नियोजन

ताज्या बातम्या

शेती महामंडळाचा राखणदार लाच घेताना जाळ्यात; यासाठी मागितले होते ३ हजार… नगर जिल्ह्यातील प्रकार…

February 3, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

हृदयद्रावक! वडिलांच्या मागे चिमुकली धावली… कारखाली येऊन मृत्यू… आई-वडिलांदेखत घडला सर्व प्रकार…

February 3, 2023

वीजेच्या अवास्तव दरवाढीची तक्रार करायची आहे? आज या मार्गदर्शनाचा नक्की लाभ घ्या

February 3, 2023

लैंगिक अत्याचार करणारे तब्बल एवढे कैदी थेट फासावर; गेल्या २० वर्षांतील सर्वाधिक संख्या

February 3, 2023

कास्टिंग काऊचवर दिग्दर्शक अनुराग कश्यप म्हणतो… ‘मी नव्या कलाकारांचा वापर करतो’

February 3, 2023

अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री अमृता अरोरा लपवतायत तोंड! पण का? असं काय केलं त्यांनी? (Video)

February 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group