India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नवी मुंबई विमानतळ नक्की कधी कार्यन्वित होणार? केंद्र सरकारने दिला हा शब्द

India Darpan by India Darpan
March 17, 2023
in संमिश्र वार्ता
0

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नवी मुंबई येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ नक्की कधी कार्यन्वित होणार असा प्रश्न सध्या सर्वांनाच पडला आहे. अखेर यासंदर्भात केंद्र सरकारने अधिकृत माहिती दिली आहे. नवी मुंबई, विजयपुरा, हसन, नोएडा (जेवार), हिरासर आणि धोलेरा हरित क्षेत्र विमानतळ पुढील तीन वर्षांत कार्यान्वित होईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

सरकारने 21 नवीन हरित क्षेत्र विमानतळांच्या उभारणीसाठी ‘तत्त्वतः’ मान्यता दिली आहे. यामध्‍ये महाराष्ट्रातील नवी मुंबई, शिर्डी आणि सिंधुदुर्ग, गोव्यातील मोपा, कर्नाटकातील कलबुर्गी, विजयपुरा, हसन आणि शिवमोग्गा, मध्य प्रदेशातील डाबरा (ग्वाल्हेर), उत्तर प्रदेशातील कुशीनगर आणि नोएडा (जेवार), गुजरातमधील धोलेरा आणि हिरासर, पुद्दुचेरीतील कराईकल, आंध्र प्रदेशातील दगडार्थी, भोगपुरम आणि ओरवाकल (कुर्नूल), पश्चिम बंगालमधील दुर्गापूर, सिक्कीममधील पॅक्योंग, केरळमधील कन्नूर आणि होलोंगी, अरुणाचल प्रदेशातील इटानगर या विमानतळांचा समावेश आहे.

यामध्‍ये 11 हरित क्षेत्र विमानतळांचा समावेश असून त्यापैकी गेल्या तीन वर्षांत 6 विमानतळांवरून विमान उड्डाण सुरू झाले आहे. उदारहरणार्थ 2021 मध्ये ओरवकल (कुर्नूल), सिंधुदुर्ग आणि कुशीनगर येथील विमानतळांचे काम सुरू झाले तर 2022 मध्ये इटानगरमधून विमानांचे उड्डाण होऊ लागले आहे. 2023 मध्ये मोपा आणि 2023 मध्ये शिवमोग्गा विमानतळे कार्यान्वित झाली आहेत.

मंत्रालयाने ज्या विमानतळांना तत्वतः मान्यता दिली आहे, त्यामध्‍ये नवी मुंबई, विजयपुरा, हसन, नोएडा (जेवार), हिरासर आणि ढोलेरा या हरित क्षेत्र विमानतळांचा समावेश आहे. यांचे काम आगामी तीन वर्षांमध्‍ये पूर्ण होण्याची शक्यता आहे.
तथापि, विमानतळांच्या बांधकामांना लागणारा कालावधी हा संबंधित विमानतळ विकासकांद्वारे भूसंपादन, अनिवार्य मंजुरी, इतर अडथळे दूर करणे, आर्थिक ताळेबंदी इत्यादी विविध घटकांवर अवलंबून आहे.

विमानतळ हे आर्थिक क्रियाकलापांचे केंद्र म्हणून उदयास आले आहे आणि त्याचा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर गुणात्मक प्रभाव पडतो. नागरी विमान वाहतूक क्षेत्र आणि आर्थिक वाढ यांच्यातील दुवा चांगल्या प्रकारे ओळखला जातो. ‘इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन (आयसीएओ) च्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, हवाई संपर्क यंत्रणा जर उत्तम असेल त्यामुळे आर्थिक विकास 3.1 गुणकाच्या पटीत होतो. तसेच रोजगाराच्या संधी वाढतात. विमानतळ असलेल्या परिसरामध्‍ये रोजगाराच्या संधी 6.1गुणकाच्या पटीत वाढतात.

देशभरातल्‍या विमानतळांच्या स्थि‍तीविषयी माहिती नागरी विमान वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांनी आज लोकसभेमध्‍ये एका लेखी उत्‍तरामध्‍ये दिली.

New Mumbai Airport Union Government in Parliament


Previous Post

नाशकात काकाचा पुतण्यावर चाकू हल्ला, पुतण्या गंभीर जखमी

Next Post

दिव्यांगांच्या वाहतूक भत्त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी केली ही घोषणा

Next Post

दिव्यांगांच्या वाहतूक भत्त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी केली ही घोषणा

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

आज या व्यक्तींनी कुठलाही व्यवहार करु नये; जाणून घ्या, मंगळवार, २१ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 20, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – २१ मार्च २०२३

March 20, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – युवक आणि युवती

March 20, 2023

ओले खोबरे खावे की सुके? नारळाच्या पाण्याचे आहेत एवढे सारे फायदे; आहारात नक्की समावेश करा

March 20, 2023

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गारपिट नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत अंतिम करणार – मुख्यमंत्री

March 20, 2023
संग्रहित फोटो

अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या ठाण्यातील कार्यालयात चोरी; हे सर्व सामान लंपास

March 20, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group