मुंबई – नवरात्रोत्सव सुरू होताच अनेक ऑटो कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर्ससह रोख सवलती जाहीर करत आहेत. कंपन्यांना त्यांची कार विक्री वाढवायची आहे, कारण कोरोना साथीमुळे कार विक्रीत सतत घट दिसून येत आहे. तसेच सेमीकंडक्टर चिप आणि इतर इलेक्ट्रॉनिक घटकांच्या कमतरतेमुळे सप्टेंबरमध्ये वाहनांच्या विक्रीतही घट झाली.
महिनाभराच्या कालावधीत, सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या मारुती कंपनीच्या विक्रीत 46.16 टक्क्यांनी घट झाली, तर ह्युंदाईची 23.6 टक्क्यांनी घट झाली. आता यावर मात करण्यासाठी, अनेक ऑटो कंपन्या रोख सवलती देत आहेत, तर अनेक एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट सवलत देत आहेत. टाटा मोटर्ससारख्या कंपन्या ग्राहकांना मोफत विमा आणि कार खरेदीवर विस्तारित वॉरंटीचा लाभ देखील देत आहेत.
ह्युंदाई
ही कंपनी ग्रँड आय 10 निओस आणि ह्युंदाई ऑरावर रोख सवलत देत आहे. एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट सूटसह 50 हजार रुपयांपर्यंत सूट देत आहे. सॅन्ड्रो आणि आय 20 सारख्या कारवर 40 हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. सँट्रो, ग्रँड आय 10 निओस आणि ऑराच्या सीएनजी प्रकारांवर एक्सचेंज ऑफर आणि कॉर्पोरेट सूट देऊन 15 हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. ह्युंदाई आपल्या ई-कार कोना इलेक्ट्रीक कारवर 1 लाख 50 हजार रुपयांपर्यंत सूट देत आहे.
होंडा
सणासुदीचा काळ लक्षात घेऊन कंपनी विविध कारवर 18 ते 53 हजार रुपयांपर्यंत सूट देत आहे. अमेझ 2021 च्या खरेदीवर लॉयल्टी बोनस, एक्सचेंज ऑफर आणि कॉर्पोरेट सवलतसह 18 हजार रुपयांपर्यंत लाभ मिळू शकतात. होंडा सिटीच्या Z- जनरेशनवर ग्राहकाला 53,500 रुपयांपर्यंत आणि Y- जनरेशनवर 22 हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. कंपनी WRV वर 40 हजार रुपयांपर्यंत आणि Jazz वर 45,900 रुपयांपर्यंत सूट देत आहे.
टाटा
सणासुदीच्या ऑफरचा भाग म्हणून कंपनी रोख सवलतीसह निऑन, टियागो, टिगोर आणि हॅरियरसारख्या कारवर रोख सवलत, एक्सचेंज बोनस, मोफत विमा आणि विस्तारित वॉरंटी देत आहे. टाटा टियागोचे विविध मॉडेल्स 23 ते 28 हजार रुपयांपर्यंतच्या सवलतीसह रोख सवलत, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट सवलतसह उपलब्ध आहेत. टिगोरच्या पेट्रोल व्हेरिएंटवर 28 हजार टाटा निऑनच्या पेट्रोल व्हेरिएंटवर 3 हजार रुपये आणि डिझेल व्हेरिएंटवर एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काउंटसह 20 हजार रुपये सूट मिळते. तसेच ई-कार टाटा निऑन ईव्हीवर 13 हजार रुपयांची सूट देत आहे, एसयूव्ही हॅरियर खरेदी करताना 15 हजार रुपयांचा लाभ मिळू शकतो.
मारुती
सणासुदीच्या काळात विक्री वाढवण्यासाठी मारुती कंपनी बलेनोच्या विविध मॉडेल्सवर एक्सचेंज बोनस, रोख आणि कॉर्पोरेट सूटसह 27 हजार रुपयांपर्यंत सूट देत आहे. प्रीमियम सेडान सियाज आणि त्याच्या अॅनिवर्सरी मॉडेल खरेदी केल्यावर 30 हजार मिळू शकतात. इग्निसच्या विविध मॉडेल्सवर 12,500 ते 17,500 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. तसेच
कंपनीच्या एस-क्रॉस आणि अॅनिवर्सरी मॉडेलवर 30 ते 45 हजार सूट उपलब्ध आहे.