मंगळवार, जुलै 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

१०० दिवस कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेत ही समिती नाशिक विभागात प्रथम

by Gautam Sancheti
मे 21, 2025 | 7:09 am
in स्थानिक बातम्या
0
Samajkalyan Office

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या १०० दिवस कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम अंतर्गत नाशिक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने नाशिक विभागात अवलस्थान मिळविले आहे. त्याअंतर्गत शासनाच्या निर्देशानुसार भारतीय गुणवत्ता प्राधिकरणाने (QCI) देखील नुकतेच कार्यालयाची पाहणी केली आहे. राज्यस्तरावरील निकाल दिनांक २३ मे रोजी जाहीर होणार आहे. या उपक्रमांतर्गत नाशिक जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालयाकडे जानेवारी २०२५ ते एप्रिल २०२५ या कालावधीत सुमारे १०५१६ प्रकरणे प्राप्त झाली होती, त्यातील सुमारे ९३२७ प्रकरणांवर समितीने जलद गतीने निर्णय घेऊन अर्जदारांना जात वैधता प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने वितरित केले आहे. तसेच तुटी पूर्तताकामी प्रलंबित असलेल्या ७४९ प्रकरणांवर निर्णय घेण्यासाठी समितीने माहे जानेवारी, फेब्रुवारी ,मार्च व एप्रिल महिन्यात विशेष तुटी पूर्तताकामी शिबिराचे देखील आयोजन केले होते. त्याचप्रमाणे १५६ अर्जदारांच्या विनंतीनुसार तातडीने सुनावणी देखील माहे जानेवारी, फेब्रुवारी, व एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या आहेत व त्या प्रकरणावर निर्णय होऊन देखील जात पडताळणी प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आले आहे.

ही सर्व प्रक्रिया सुरळीत व जलद गतीने होण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील ५२७ महाविद्यालयांचे प्राचार्य व संबंधित कर्मचारी यांची माहे जानेवारी व एप्रिल महिन्यात दोन टप्प्यांमध्ये ऑनलाईन वेबिणार आयोजित करण्यात आला होता, यामध्ये समितीचे अध्यक्ष, उपायुक्त, संशोधन अधिकारी व शिक्षणाधिकारी यांनी याबाबत विशेष सूचना निर्गमित केल्या होत्या. तसेच दिनांक ४ एप्रिल २०२५ रोजी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय नाशिक येथे ऑनलाईन प्रणालीनुसार मार्गदर्शन शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते. त्याचा ३०० अधिक विद्यार्थ्यांना लाभ झाला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दिनांक १४ एप्रिल २०२५ रोजी जिल्हाधिकारी श्री.जलज शर्मा यांच्या हस्ते देखील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहेत.

शासनाच्या कार्यालयीन सुधारणा विशेष अंतर्गत समितीने केलेल्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.समाज कल्याण विभागाने देखील जात प्रमाणपत्र समितीचे मूल्यांकन केले असून नाशिक विभागातील सर्व समित्यांमध्ये नाशिक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवलस्थान मिळवले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

टाइम १०० फिलॅंथ्रॉपीच्या जागतिक यादीत मुकेश आणि नीता अंबानी यांचा समावेश

Next Post

आरक्षित भूखंडावर प्रदर्शन केंद्राचे बांधकाम…एनआयटी, मुख्यमंत्री आणि भारतीय वायुसैन्याकडे या आमदाराची तक्रार

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
WhatsApp Image 2025 05 15 at 8.24.46 PM

आरक्षित भूखंडावर प्रदर्शन केंद्राचे बांधकाम…एनआयटी, मुख्यमंत्री आणि भारतीय वायुसैन्याकडे या आमदाराची तक्रार

ताज्या बातम्या

solar e1703396140989

मॉडेल सौर ग्राम स्पर्धेमध्ये राज्यातील ६३ गावांचा सहभाग…विजेत्या गावाला केंद्राकडून एक कोटी रुपयांचे अनुदान

जुलै 8, 2025
bus

एस.टी. कार्यशाळेतील भांडार खरेदीत घोटाळा…१५ अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

जुलै 8, 2025
crime1

रिक्षातून शेतातील साहित्य चोरून नेणा-या दोघांना पोलीसांनी ठोकल्या बेड्या

जुलै 8, 2025
mahavitarn

महावितरणच्या २३ पैकी ६ कर्मचारी संघटनांचा उद्या एक दिवसाचा संप…

जुलै 8, 2025
band

उद्या भारत बंद…देशातील २५ कोटी कामगार आंदोलनात उतरणार…या सेवांवर होणार परिणाम

जुलै 8, 2025
Untitled 23

मंत्री प्रताप सरनाईकांना मोर्चात विरोध, ५ मिनिटांत निघावं लागलं…त्यानंतर दिले हे स्पष्टीकरण

जुलै 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011