मंगळवार, जुलै 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकमध्ये झालेल्या राष्ट्रीय ब्रीज स्पर्धेत यांना मिळाला विजेतेपद….भारतीय संघांत होणार निवड

by Gautam Sancheti
मे 31, 2025 | 5:29 pm
in स्थानिक बातम्या
0
Bridge Day 3 2

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– महाराष्ट्र ब्रीज असोसिएशनआणि ब्रीज फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने नाशिकमध्ये २९ ते ३१ मे, २०२५ दरम्यान ज्युनियर आणि सब-ज्युनियर गटाच्या ” तोलानी चषक ” राष्ट्रीय ब्रीज स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भारत सरकारच्या स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) यांच्याकडून ब्रीज या खेळाला मान्यता असून त्यांच्याकडून ब्रीज खेळाच्या सर्व उपक्रमासाठी साईकडून सहकार्य मिळत आहे. “तोलानी शिपिंग कंपनी” यांनी पुरस्कृत केलेल्या या राष्ट्रीय स्पर्धेला २९ मे रोजी मोठ्या उत्साहात सुरवात झाली. नाशिकच्या गंगापूर रोड, सोमेश्वर मंदिरजवळील गुप्ता गार्डन येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय ब्रीज फेडेरेशन यांच्या मार्गदर्शक नियमावलीनुसार या स्पर्धेमध्ये १६ वर्षे, २१ वर्षे, २६ वर्षे आणि ३१ वर्षे मुले आणि मुली या चार वयोगटाचा अंतर्भाव आहे.

यामध्ये ” टीम चॅम्पिअनशिप” ( टीम ऑफ फोर), मॅच पॉईंट पेअर्स आणि आय. एम. पी. पेयर्स या तीन प्रकारच्या स्पर्धाचा अंतर्भाव आहे. काल आणि आज ” मॅच पॉईंट पेअर्स ” प्रकारच्या स्पर्धा खेळविल्या गेल्या. यामध्ये १६ वर्षे गटामध्ये जषीत नारंग आणि अनन्या मेहता या जोडीने कालप्रमाणे आजही आपले विजयी अभियान कायम राखत सर्वात जास्त ९८.०५ गुण मिळवत या गटाचे विजेतेपद पटकावले.

या गटात प्रखर बन्सल आणि विहा गहरोत्रा या जोडीनेही चांगला खेळ पहिल्या क्रमांकासाठी चांगली झुंज दिली. परंतु त्यांना ९७.५५ गुण मिळाल्यामुळे केवळ अर्ध्या गुणांच्या फरकामुळे दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. २१ वर्षे गटामध्ये गीता गई गुप्ता आणि नचिकेता या जोडीने सर्वात जास्त ११९.७९ गुणांची कमाई करत या गटात विजेतेपदावर आपले नांव कोरले. या गटात तीर्थराज आणि माधव प्रकाश या जोडीने १०३.३० गुणांसह दुसरे स्थान मिळविले तर बी. विग्नेश्वरानं आणि भावनेश्वर यांनी १०१. गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळविला.

२६ वर्षे गटामध्ये प्रदीप डे आणि स्वर्णशिष चॅटर्जी यांनी प्रथम पासून आघाडी घेत या गटात ३३६. २० गुणांची कमाई करत विजेतेपद मिळविले. या गटात कल्पना गुर्जर आणि शुभम आचार्य या जोडीने ३२६.८० गुणांसह दुसरे स्थान पटकावले, तर मोनुकुमार आणि सौविक साहा या जोडीने ३२३.८० गुण मिळवत तिसरे स्थान मिळविले

आय. एम. पी. पेअर्स मध्ये जषीत आणि अनन्या मेहता यांची आघाडी – आज दुपारी आय. एम. पी. पेअर्स या प्रकाराला सुरवात झाली. आज खेळल्या गेलेल्या सात राऊंडनंतर अधियामन आणि अग्लेन या जोडीने ८९.८३ गुण मिळवत या गटात आघाडी घेतली आहे. तर जषीत नारंग आणि अनन्या मेहता या जोडीनेहि सुंदर खेळ करत ७१.०० गन मिळवत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. २१ वर्षे गटामध्ये तीर्थराज आणि माधव प्रकाश या जोडीने पुन्हा सुंदर खेळाचे प्रदर्शन करततब्बल १०१.०० गुणांसह या गटात मोठी आघाडी घेतली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कुंज छेडा आणि विनीत नंदू या जोडीने ४३.०० गुण मिळविले आहेत.

या स्पर्धेवर केंद्र शासनाच्या साईचे उपसंचालक नितीन कुंडू, साईचे ब्रीज खेळाचे प्रमुख संतोष कुमार नजर ठेवून आहेत.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आणि ज्युनियर खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय ब्रीज फेडेरेशनचे उपाध्यक्ष तथा ज्युनियर खेळाडूंच्या डेव्हलपमेंट कमिटीचे सचिव आनंद सामंत, आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि प्रशिक्षक अनिल पाध्ये, महाराष्ट्र ब्रीज असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. अविनाश देशमुख, महाराष्ट्र ब्रीज असोसिएशनचे सचिव तथा या स्पर्धेचे आयोजन प्रमुख हेमंत पांडे \, खजिनदार माधव होनप हे प्रयत्नशील आहेत. स्पर्धेची तांत्रिक बाजू स्पर्धा संचाकल के. एस. स्वामिनाथन सांभाळत आहेत.

भारतीय संघांची निवड – या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे खेळाडूंची भारताच्या संघासाठी निवड केली जाणार आहे. हे निवड झालेले खेळाडू दिनांक ११ ते १७ जुलै, २०२५ दरम्यान इटली येथील सोल्सोमाज ओरे शहरात आयोजित जागितिक ब्रीज स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करतील अशी माहिती या स्पर्धेचे आयोजन प्रमुख तथा महाराष्ट्र ब्रीज असोसिएशनचे सचिव आणि स्पर्धा प्रमुख हेमंत पांडे यांनी दिली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भाजपाच्या उर्वरित २२ जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा…नाशिकमध्ये यांना संधी

Next Post

मुख्यमंत्री यांच्या हस्ते रविवारी आरोग्य विद्यापीठाच्या ‘चक्र’ प्रकल्पाचे भूमिपूजन व उद्घाटन

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Untitled 62

मुख्यमंत्री यांच्या हस्ते रविवारी आरोग्य विद्यापीठाच्या ‘चक्र’ प्रकल्पाचे भूमिपूजन व उद्घाटन

ताज्या बातम्या

solar e1703396140989

मॉडेल सौर ग्राम स्पर्धेमध्ये राज्यातील ६३ गावांचा सहभाग…विजेत्या गावाला केंद्राकडून एक कोटी रुपयांचे अनुदान

जुलै 8, 2025
bus

एस.टी. कार्यशाळेतील भांडार खरेदीत घोटाळा…१५ अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

जुलै 8, 2025
crime1

रिक्षातून शेतातील साहित्य चोरून नेणा-या दोघांना पोलीसांनी ठोकल्या बेड्या

जुलै 8, 2025
mahavitarn

महावितरणच्या २३ पैकी ६ कर्मचारी संघटनांचा उद्या एक दिवसाचा संप…

जुलै 8, 2025
band

उद्या भारत बंद…देशातील २५ कोटी कामगार आंदोलनात उतरणार…या सेवांवर होणार परिणाम

जुलै 8, 2025
Untitled 23

मंत्री प्रताप सरनाईकांना मोर्चात विरोध, ५ मिनिटांत निघावं लागलं…त्यानंतर दिले हे स्पष्टीकरण

जुलै 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011