India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

बायको आणि मुलांना वाचवलं… स्वतः मात्र… कुटुंबाच्या डोळ्यादेखत जवान कालव्यात वाहून गेला… सिन्नर तालुक्यातील दुर्घटना

India Darpan by India Darpan
March 10, 2023
in संमिश्र वार्ता
0

सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सुट्टीवर आलेले सिन्नर तालुक्यातील मेंढी येथील केंद्रीय राखीव सुरक्षा बलातील जवान गणेश सुखदेव गीते गोदावरी नदीच्या उजव्या कालव्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मोटरसायकवरुन शिर्डी येथून साईबाबांचे दर्शन घेऊन ते घरी परतत असतांना सिन्नर तालुक्यातील चोंडी येथे ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, गीते यांच्या सहा वर्षाच्या मुलीचा मोटरसायकलच्या हँडल मध्ये पाय अडकला. त्यामुळे गाडीचा तोल गेला. आणि मोटारसायकलवरील जवान गणेश गीते यांच्यासह त्यांची पत्नी रुपाली, सहा वर्षांची मुलगी आणि दीड वर्षांचा मुलगा हे सर्व जण गोदावरीच्या उजव्या कालव्यात पडले. परिस्थिती लक्षात घेता जवान गीते यांनी पत्नी रूपाली सह सहा वर्षाची मुलगी व दीड वर्षाच्या मुलाला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यात त्यांना यश आले. पण, ते स्वतः मात्र पाण्यात वाहून गेले. आपल्या कुटुंबादेखत जवान गीते हे कालव्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.  या घटनेनंतर आपत्ती व्यवस्थापन आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने य़ेते शोधकार्य सुरू झाले आहे.

गुरुवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर आतापर्यंत शोध सुरु आहे. गोदावरीच्या उजव्या कालव्याला सिंचनासाठी पाणी सोडण्यात आल्यामुळे पाण्याच्या प्रवाहाचा वेग जास्त आहे. त्यामुळे ते या पाण्यात वाहून गेले. रात्रीपासून शोधकार्य सुरू असून अद्यापही त्यांचा शोध लागलेला नाही. या घटनेत सर्व कुटुंबच पाण्यात पडले. पण, गीते यांनी पत्नीसह मुलांना वाचवले. यात त्यांचा श्वास कोंडला त्यामुळे ते वाहून गेले. या घटनेची माहिती सिन्नरसह परिसरात सर्वत्र गेल्यानंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गणेश सुखरूप असावा अशी प्रार्थना सुध्दा केली जात आहे.

Nashik Sinner Accident Jawan Washed Away Godavari Canal


Previous Post

महाविकास आघाडीने थोपटले दंड; लोकसभा-विधानसभा निवडणुकांसाठी घेतला हा मोठा निर्णय

Next Post

संतापजनक! चक्क जात विचारुन शेतकऱ्यांना खताची विक्री; सरकार वर्णभेद करतेय? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…

Next Post

संतापजनक! चक्क जात विचारुन शेतकऱ्यांना खताची विक्री; सरकार वर्णभेद करतेय? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले...

ताज्या बातम्या

मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक; केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केली ही मोठी घोषणा

March 24, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज खर्चाची तयारी ठेवावी; जाणून घ्या, शनिवार, २५ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 24, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शनिवार – २५ मार्च २०२३

March 24, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – १ कोटीची लॉटरी

March 24, 2023

आदिवासी तरुणांना संधी का मिळत नाही? सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहचतात का? खरं आणि जळजळीत वास्तव हे आहे…

March 24, 2023

कोल्हापूरमध्ये येणार हा मोठा प्रकल्प… ८ हजार कोटींची गुंतवणूक… ५ हजार जणांना रोजगार

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group