India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशिक शहराबाहेर थर्टी फर्स्ट आणि न्यू इअर सेलिब्रेशन करायचंय? आधी हे वाचा, मग ठरवा

India Darpan by India Darpan
December 30, 2022
in स्थानिक बातम्या
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उद्या ३१ डिसेंबर आणि परवा १ जानेवारी आहे. त्यामुळे नाशिक शहराबाहेर जर तुम्ही थर्टी फर्स्ट आणि न्यू इअर सेलिब्रेशन करण्याचा विचार करीत असाल तर आधी ही बातमी वाचा. कारण, नाशिक ग्रामीण पोलिसांनी या सेलिब्रेशनच्या निमित्ताने खास नियोजन केले आहे.

नाशिक शहराबाहेरील आणि खासकरुन गंगापूर व अन्य धरणांच्या परिसरात न्यू इअर सेलिब्रेशन करण्याचे नियोजन केले जाते. गेल्या काही वर्षांच्या ट्रेण्ड तेच सांगतो. शिवाय नाशिक शहराबाहेरील हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्येही त्यामुळेच गर्दी पहायला मिळते. मात्र, नाशिक ग्रामीण पोलिसांनी आता ठिकठिकाणी नाकेबंदी करण्याचे निश्चित केले आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक शहाजी उमप यांनी यांदर्भातील माहिती दिली आहे.

पोलिस अधिक्षक उमप म्हणाले की, ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या दोन्ही दिवशी कडक पोलिस बंदोबस्त असणार आहे. जिल्ह्यात शुक्रवारी (३० डिसेंबर) आणि शनिवारी (३१ डिसेंबर) कडक नाकाबंदी केली जाणार आहे. नववर्षानिमित्त देशभरातील पर्यटक व भाविक देवदर्शनासह पर्यटनासाठी येतात. शिवाय, नाशिक शहरातील नागरिक नाशिक जिल्ह्यातील फार्म हाऊससह विविध हॉटेल्समध्ये सेलिब्रेशनसाठी जातात. कोरोनाचे निर्बंध शिथील झाल्याने दोन वषार्नंतर नववर्षाच्या स्वागतासाठी नाशिककरांनी प्लॅन्स आखले आहेत. जिल्ह्यातील अनेक हॉटेल्स, रिसॉर्टची बुकिंग झाली आहे. या ठिकाणी गैरप्रकार घडू नये, यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस सतर्क झाले आहेत. जिल्ह्यात ४० पोलीस ठाणेनिहाय नाकाबंदीचे नियोजन करण्यात आले आहे.

अपघात टाळण्यासाठी मद्यपान करून कुणीही वाहन चालवू नये असे पोलिसांच्या वतीने आवाहन करण्यात आले असून या काळात नाकाबंदीद्वारे मद्यपींची ब्रेथ अनालायझरच्या माध्यमातून तपासणी केली जाणार आहे. तसेच भरधाव वाहनांवरही स्पीड गनमार्फत कारवाई केली जाणार आहे. जिल्हाभरात पोलिस पथके तैनात करण्यात आली आहेत. जिह्यातील ४० पोलिस ठाणे अंतर्गत बंदोबस्ताचे नियाजोन करण्यात आले असून कुठेही गैरप्रकार घडू नयेत यासाठी पोलिस दल सज्ज झाले आहे. रात्री आठ वाजेपासून प्रत्येक पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदी करुन तपासणी केली जाणार आहे. मद्यप्राशन करुन वाहने चालवणा?ºयांसह टवाळखोर व हुल्लडबाजी करणा?ºयांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहेत. याबरोबरच जिल्ह्यातील सर्व आस्थापना, मॉल्स, दुकाने, उपहारगृहांना वेळेचे पालन करण्याच्या सुचना देण्यात आल्याची माहिती उमाप यांनी दिली.

Nashik Rural Thirty First and New Year Celebration Police Plan


Previous Post

मंत्रालयातील त्या बोगस भरतीप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी केली ही घोषणा

Next Post

आदिवासी युवकांसाठी सुरू झालेला ‘नवचेतना स्वयंदीप आत्मनिर्भरता कक्ष’ आहे तरी काय?

Next Post

आदिवासी युवकांसाठी सुरू झालेला 'नवचेतना स्वयंदीप आत्मनिर्भरता कक्ष' आहे तरी काय?

ताज्या बातम्या

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने सुरू केली व्हॉटस्अ‍ॅप बँकिंग सेवा; असा होणार ग्राहकांना फायदा

April 2, 2023
प्रातिनिधिक फोटो

४५ वर्षाची मामी आणि २४ वर्षाचा भाचा.. दोघांचे प्रेमसंबंध… त्यानंतर असं घडलं की पोलिसही झाले अवाक…

April 2, 2023

हाय रे देवा… कांद्याला मिळाला २५ पैसे प्रतिकिलो भाव… शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू… दिवसेंदिवस परिस्थिती बिकट…

April 2, 2023

मालेगावात गजबजलेल्या ठिकाणावरुन दुचाकी चोरीला; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद (व्हिडिओ)

April 2, 2023

दंगलींमध्ये राज्य सरकारचाच सहभाग… आमचा मार्ग अडविण्यासाठीच दंगल… संजय राऊतांचा हल्लाबोल

April 2, 2023

बागेश्वर बाबांचे साईबाबांविषयी वादग्रस्त विधान… भाविकांमध्ये असंतोष… बघा काय म्हणाले ते…

April 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group