India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर अडचणीत; न्यायालयाने दिला हा निकाल

India Darpan by India Darpan
February 15, 2023
in स्थानिक बातम्या
0

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर अडचणीत सापडले आहेत. बडगुजर यांच्यासह इतर दोघांना नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दीड वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी बडगुजर आणि इतर दोघांवर खटला सुरू होता. त्याचा निकाल आज लागला. दरम्यान, बडगुजर यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

२०१४च्या लोकसभा निवडणुकीत बडगुजर आणि अन्य दोघांच्या वाहनात शस्त्र आढळून आले होते. त्यावेळी तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त आणि अंबड पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक यांनी बडगुजर यांची विचारपूस केली. मात्र, त्यावेळी बडगुजर आणि अन्य दोघांनी हुज्जत घालत सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. याचा खटला नाशिक सत्र न्यायालयात सुरू होता. आणि आता न्यायालयाने बडगुजरसह अन्य दोघे दोषी आढळले आहेत. त्यामुळेच त्यांना कलम ३५३ प्रमाणे एक वर्षाची शिक्षा आणि प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड, तसेच कलम ३७ आणि १३५ प्रमाणे सहा महिने कारावास आणि प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तशी माहिती सरकारी वकील रवींद्र निकम यांनी दिली आहे.

दरम्यान, ठाकरे गटाचे नेते दत्ता गायकवाड यांनी प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले की, घटना घडली त्या दिवशी सरकारी कामात अडथळा आणल्याचे एकूण तेरा गुन्हे दाखल झाले होते. या इतर गुन्ह्यातील सर्व दोषी निर्दोष सुटले. आणि बडगुजर व अन्य दोघांनाच शिक्षा झाली. या निर्णयाविरोधात आम्ही उच्च न्यायालयात अपील करणार आहोत.

Nashik Politics Sudhakar Leader Court Order


Previous Post

इयत्ता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; बोर्डाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

Next Post

दिंडोरी तालुक्यात भीषण रस्ते अपघात; काका आणि दोन पुतण्यांचा मृत्यू, तिसगाव गावावर शोककळा

Next Post

दिंडोरी तालुक्यात भीषण रस्ते अपघात; काका आणि दोन पुतण्यांचा मृत्यू, तिसगाव गावावर शोककळा

ताज्या बातम्या

या व्यक्तींवर आज लक्ष्मी प्रसन्न राहील; जाणून घ्या, रविवार, २ एप्रिल २०२३चे राशिभविष्य

April 1, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २ एप्रिल २०२३

April 1, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पतीचा मोबाईल

April 1, 2023

नाशिकचे रामकुंड आणि गोपिकाबाई यांचा काय संबंध आहे…. असा आहे इतिहास…..

April 1, 2023

हा एक निर्णय घ्या… कांद्याचा प्रश्नच मिटून जाईल… कांदा उत्पादक संघटनेने दिला हा मोठा पर्याय

April 1, 2023

कोरोना अपडेट : देशात गेल्या २४ तासात इतक्या नव्या कोरोना रुग्णांची नोंद

April 1, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group