India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

चर्चा तर होणारच! ठाकरे गटाच्या बॅनरवर झळकताय शिंदे गटाचे नेते

India Darpan by India Darpan
November 25, 2022
in स्थानिक बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकीकडे उद्धव ठाकरे शिवसेना वाचविण्यासाठी शिंदे गटाशी दोन हात करीत असताना दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे स्थानिक पातळीवर शिलेदार मात्र शिंदे गटाचा उदो-उदो करीत असल्याची बाब समोर आली आहे. माजी नगरसेविका हर्षदा गायकर यांनी विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने शहरात लावलेल्या फलकांवर शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांची छबी दिमाखात झळकत असल्याने सामान्य शिवसैनिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांच्यामदतीने मोठी बंडखोरी केली. तसेच, त्यांनी शिवसेना पक्षावरही दावा केला आहे. चाळीस आमदार आणि बारा खासदार सोबत असल्याचा हवाला देत आपणच खरी शिवसेना असल्याचे ठासून सांगत आहेत. एवढ्यावरच न थांबता पक्षचिन्ह धनुष्य बाणावरही हक्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या या साऱ्याच मुद्द्यांवरून न्यायालयीन लढाई सुरु आहे.  दरम्यानच्या काळात धनुष्य बाण हे चिन्ह गोठविले गेले तर शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि बाळासाहेंबांची शिवसेना, असे दोन गट तयार तयार झाले.गोठविलेले पक्ष चिन्ह आणि पक्षाचे झालेले दोन तुकडे यामुळे सामान्य शिवसैनिक प्रचंड संपायला आहे. शिंदे गटाविरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे शिंदे गटाशी दोन हात करीत असून पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धडपड करीत आहे. असे असताना स्थानिक पातळीवरील पदाधिकारी मात्र शिंदे गटाचा उदो-उदो करीत असल्याचे बाब समोर आली आहे.

गायकर या गेल्या पंचवार्षिकमध्ये नाशिक शहरात शिवसेनेच्या नगरसेविका होत्या. एवढेच नाही तर युवा सेनेच्या उपजिल्हा प्रमुखही आहेत. याच गायकर यांनी डीजीपी नगर तीन मध्ये खासदार गोडसे यांच्या निधीतून कॉलनी रस्त्यांचे काँक्रीटीकरणचे उदघाटन आणि सीसीटीव्हीही चे लोकार्पण हा कार्यक्रम शुक्रवारी आयोजित केला होता. त्यासाठी परिसरात फलकबाजीही करण्यात आली होती. या फलकावर गोडसे यांची छबी दिमाखात झळकत होती. यावरून खासदारांनी निधी उपलब्ध करून दिला म्हणून त्यांचे छायाचित्र लावले कि गायकर स्वतः शिंदे गटात प्रवेश करणार, असे मानायचे, असे अनेक प्रश्न निर्माण झाले. कारण काहीही असले तरी गायकर यांच्या कृतीने सामान्य शिवसैनिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला.

Nashik Politics Shivsena Thackeray and Shinde Group Banner


Previous Post

सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा परिसरात सशस्त्र दरोडा; हातपाय सेलोटेपने बांधले

Next Post

शिंदे गटाचा नेताच म्हणतो, ‘आमचे ४० रेडे गुवाहाटीला जाताहेत, पण मी नाही जाणार’

Next Post

शिंदे गटाचा नेताच म्हणतो, 'आमचे ४० रेडे गुवाहाटीला जाताहेत, पण मी नाही जाणार'

ताज्या बातम्या

राशीभविष्य

या व्यक्तींनी व्यवहार करताना घ्यावी काळजी, जाणून घ्या बुधवार ४ ऑक्टोंबर २०२३चे राशिभविष्य

October 3, 2023

सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया ९ ऑक्टोबर पासून सुरू, असा आहे निवडणूक कार्यक्रम

October 3, 2023

भारतीय रेल्वेने केले वेळापत्रक प्रसिद्ध, या संकेतस्थळावर उपलब्ध

October 3, 2023
प्रातिनिधिक फोटो

राज्यातील २३५९ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, आचारसंहिता लागू, पहा सर्व महत्वाच्या तारखा

October 3, 2023

वारकरी बांधवांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मंत्र्याकडे दिली जबाबदारी

October 3, 2023

दिंडोरी पोलिसांना तुरी देऊन फरार झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपीनेही केली आत्महत्या…

October 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group