नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांची आज राज्य सरकारने तडकाफडकी बदली केली आहे. तसेच, अंकुश शिंदे हे आता नाशिक शहर पोलिस आयुक्त म्हणून रुजू होणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्य सरकारने आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. त्यात नाईकनवरे यांच्या बदलीचाही समावेश आहे. अंकुश शिंदे हे पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त होते. त्यांच्याकडे आता नाशिकची जबाबदारी देण्यात आली आहे. नाईकनवरे यांनी काही महिन्यांपूर्वीच नाशिकचा पदभार स्विकारला होता. मात्र, आता त्यांची बदली करण्यात आली आहे.
दरम्यान, नाशिक विशेष पोलिस महानिरीक्षक पदावर आयपीएस अधिकारी सुनिल फुलारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. फुलारी हे सध्या पुणे मोटार परिवहन विशेष पोलिस महानिरीक्षक आहेत.
Nashik Police Commissioner Transfer Order