नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक मनपा हद्दीतील प्र.क्र.१२ मधील नाशिक पश्चिम विभागातील तिडके कॉलनी परिसरातील स्त्री मंडळ जलकुंभ लव्हाटे नगर जलकुंभ,व महात्मानगर जलकुंभ या टाक्या सातपुर विभागातील ६०० मी.मी. व्यासाची पाईप लाईन वरून शिवाजी नगर जलशुध्दीकरण केंद्र येथून भरली जात असतात. सद्यस्थितीत या जलकुंभा वरून होणारा पाणी पुरवठा कमी दाबाने होत असून पुरेृशा प्रमाणात जलकुंभ भरले जात नाहीत. या समस्येवर उपाय योजना करणे हेतु आयुक्त तथा प्रशासक यांनी दिलेल्या निर्देशानुसार जलशुध्दीकरण केंद्र वरून उपलब्ध पाण्याचे फेर नियोजन करणे आवश्यक आहे. कारणास्तव या जलकुंभावरून होणारा पाणी पुरवठा वितरणात सुधारणा करणे करीता या जलकुंभाची भरणेची वेळ व परिसरात पाणी पुरवठा वितरणाची वेळ यात प्रायोगिक तत्वावर बदल करून या जलकुंभ वरून होणारा पाणी पुरवठा परिसरातील नागरीकांना पुरेशा प्रमाणात व योग्य दाबाने होऊ शकेल.
तरी महत्मा नगर, कामगार नगर, पारीजात नगर, सुयोजित नगर या परिसरातील नागरीकांनी पाणी पुरवठा वितरण वेळेत बदल झाल्याबाबतची नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे असे आवाहन मनापने केले आहे.
सुधारित वितरण तक्ता खालील प्रमाणे
- जलकुंभाचे नांव : स्त्री मंडळ जलकुंभ – लव्हाटे नगर जलकुंभ – महात्मानगर जलकुंभ
- जलकुभाची क्षमता : 20 लक्ष लि.– 1 5 लक्ष लि – 60 लक्ष लि
- सद्यस्थिीत वितरणाची : सध्या. 6 ते 8 संध्या- 5.30 ते 7.30 सकाळी – 6 ते 8 संध्या. 6 ते 8
४. नविन वितरणाची : वेळेत बदल नाही- वेळेत बदल नाही – संध्याकाळी 5 ते 8 सुधारीत वेळ