India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या कार्यालयावर भ्याड हल्ला; औद्योगिक संघटनांकडून तीव्र निषेध

India Darpan by India Darpan
May 25, 2023
in स्थानिक बातम्या
0

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केवळ नाशिकच नव्हे तर राज्यातील उद्योजकांचे नेतृत्व करणारे नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)चे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या अंबड औद्योगिक वसाहतीतील कंपनीत घुसुन काही समाजकंटकांनी केलेला भ्याड हल्ला व दहशत माजविण्याचा केलेला प्रयत्न निंदनीय आहे.या समाजकंटकांवर गुन्हे दाखल करून त्यांना त्वरित अटक करावी.आणि तसे न झाल्यास आम्हाला तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा नाशकातील सर्व औद्योगिक संघटनांतर्फे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांना एका निवेदनाद्वारे देण्यात आला.

धनंजय बेळे हे केवळ नाशिकच नव्हे तर महाराष्ट्र आणि राज्यातील उद्योजकांचे नेतृत्व करतात. कोणत्याही उद्योजकावर अन्याय झाल्यास त्याच्या मदतीसाठी बेळेच प्रथम धाव घेतात व त्या उद्योजकास न्याय मिळवून देतात.नाशकात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक यावी तसेच औद्योगिक वसाहतीचा विस्तार व्हावा यासाठी ते सातत्याने प्रयत्न करतात.असे असतांना रविवार दि.21मेरोजी दुपारी 12.30 वाजता काही समाजकंटक अंबड औद्योगिक वसाहतीतील एस.एस.एंटरप्राइजेस कंपनीच्या कार्यालयात घुसले. तेथील सामानाची नासधूस केली तसेच तेथील महिला कर्मचाऱ्यांबाबत अर्वाच्य भाषेत वक्तव्य करून शाई फेकण्याचा प्रयत्न केला. खुर्चीला चपलांचा हार घालत शिवीगाळ केली. दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे औद्योगिक वसाहतीत दहशतीचे वातावरण पसरले आहे.

निमा ही उद्योजकांची शिखर संस्था आहे. त्यामुळे बेळे यांच्या कार्यालयावर झालेला हल्ला म्हणजे नाशिकचा औद्योगिक जगतावर झालेला झालेला हल्ला आहे असे आम्ही समजतो. आमचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध दहशत माजविण्याचा कुणी प्रयत्न करीत असेल तर ते निश्चितच नाशिक नगरीसाठी भूषणावह नाही. यामुळे उद्योग जगतावर विपरित परिणाम होऊन नाशिकची प्रतिमा खराब होण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असेही पत्रकात पुढे म्हटले आहे.

सदर भ्याड हल्ला नाशिकमध्ये येऊ घातलेल्या गुंतवणुकीला बाधा आणणारा तसेच कोविडनंतर नुकत्याच सुरु झालेल्या रोजगार निर्मितीला खीळ घालणारा आहे,त्यामुळे आम्ही नाशिकमधील सर्व संघटनांचे प्रतिनिधी आपणास विनंती करतो की सदरील झालेल्या भ्याड हल्लाबाबत आपण स्वतः लक्ष घालुन ताबडतोब चौकशी करावी व त्या सर्व समाजकंटकांना अटक करुन त्यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करावेत अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

निमा कार्यालयात आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीस सिन्नर,इगतपुरी दिंडोरी, लखमापूर,पिंपळगाव,मालेगाव, येवला आदी ठिकाणच्या औद्योगिक वसाहतीतील 350हून अधिक उद्योजक उपस्थित होते आणि त्या सर्वांनीही बेळे यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला.

निवेदनाखाली निमाचे उपाध्यक्ष आशिष नहार,सचिव राजेंद्र अहिरे,महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, उपाध्यक्ष सुधाकर देशमुख,आयमा अध्यक्ष निखिल पांचाल, सरचिटणीस ललित बूब,नाईसचे उपाध्यक्ष रमेश वैश्य,निपम अध्यक्ष प्रकाश बारी,सचिव हेमंत राख,लघुभारतीचे अध्यक्ष विवेक कुलकर्णी,सचिव निखिल तापडिया,रोटरी नाईन हिल्सचे सचिव हेमंत खोंड आदींच्या सह्या आहेत.

या विषयाबाबत संबंधित समाजकंटकांना योग्य शासन करावे व ही घटना अत्यंत गंभीरतेने घेऊन पोलीस प्रशासन तसेच राज्य शासनाने यामध्ये लक्ष घालावे व धनंजय बेळे यांच्यावरील हल्ल्यामध्ये आम्ही सर्व खंबीरपणे त्यांच्या बरोबरीने उभे आहोत असे महाराष्ट्रातील अनेक औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधिन्चे निमा सचिवांना निरोप आले असून वेळप्रसंगी संपूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन उभे करू अशा प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. यामध्ये छत्रपती संभाजी नगर, धुळे, जळगाव,अहमदनगर,पिंपरी चिंचवड,डोंबिवली ठाणे, अंबरनाथ आदि ठिकाणच्या औद्योगिक संघटनेच्या अध्यक्ष व प्रतिनिधींनी पाठवले आहेत.

निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या कंपनी कार्यालयावर झालेला हल्ला म्हणजे एकप्रकारे गुंडगिरीचाचाच आणि उद्योग जगताला आव्हान देण्याचाच हा प्रकार आहे.उद्योजकांच्या कार्यालयावर अशाप्रकारे हल्ले होत असतील तर ते आम्ही मुळीच खपवून घेणार नाही.पोलीस प्रशासनाने वेळीच याची दखल घेऊन अशा शक्तींचा तातडीने बिमोड करावा.या प्रकरणात लक्ष घालण्याची तसेच उद्योजकांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी कडक कायदा करावा,अशी मागणी आम्ही राज्य शासनाकडे करणार आहोत
– ललित गांधी, अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री

Nashik Nima President Bele Office Attack


Previous Post

दुर्दैवी! उन्हाळी सुटीत गावी आला.. अंगणात खेळता खेळता विहीरीत पडला… चिमुकल्याचा मृत्यू… मोहाडी येथील दुर्घटना

Next Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – संता आणि त्याचे लग्न

Next Post

इंडिया दर्पण - हास्य षटकार - संता आणि त्याचे लग्न

ताज्या बातम्या

मालेगावमध्ये पोलिस शिपाई एसीबीच्या जाळ्यात; यासाठी मागितले ४ हजार

June 6, 2023

अमृता फडणवीस पुन्हा एकदा ट्रोल; आता हे आहे कारण…

June 6, 2023

आज विरोधक सक्रीय होतील; जाणून घ्या बुधवार, ७ जून २०२३चे राशिभविष्य

June 6, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – बुधवार – ७ जून २०२३

June 6, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – लायब्ररी

June 6, 2023

अतिखोल अरबी समुद्रातील अति तीव्र चक्रीवादळ… महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

June 6, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group