India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

उद्याने, जॉगिंग ट्रॅकवर सीसीटीव्ही बसवा; शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनची मागणी

India Darpan by India Darpan
December 26, 2022
in स्थानिक बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कचरा टाकणारे, साहित्यांची चोरी करणारे यासह मद्यपी व टवाळखोरांवर कारवाई करता यावी; महापालिकेच्या मालमत्तेचे, नागरिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी उद्याने आणि जॉगिंग ट्रॅकवर स्मार्ट सिटीमार्फत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनने केली आहे. महापालिका आयुक्तांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे.

गोविंदनगर, जुने सिडको, कालिका पार्क, उंटवाडी, कर्मयोगीनगर, तिडकेनगर, मंगलमूर्तीनगर, जगतापनगर, बाजीरावनगर, सद्गुरूनगर, सदाशिवनगर, बडदेनगर, पांगरे मळा, खोडे मळा, काशिकोनगर, बेळे कॉलनी, कृष्णबन कॉलनी, भुजबळ फार्म परिसरातील अनेक उद्याने आणि जॉगिंग ट्रॅक हे टवाळखोर आणि मद्यपींचे अड्डे झाले आहेत. तेथे झाडपाला व इतर कचरा टाकला जातो, यामुळे अस्वच्छतेचे साम्राज्य असते. महिला-पुरुषांच्या गळ्यातील दागिने लंपास करण्याच्या घटनाही घडतात. संरक्षक जाळ्या, ग्रीन जिमचे साहित्य यांचीही चोरी होते. या सर्व गैरप्रकारांना आळा बसावा, संबंधितांवर कारवाई करता यावी, नागरिकांचे रक्षण व्हावे, यासाठी स्मार्ट सिटीमार्फत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे निवेदन शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख) यांच्या पुढाकाराने देण्यात आले.

शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगिता देशमुख, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, निलेश ठाकूर, यशवंत जाधव, संध्या छाया ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष विठ्ठल देवरे, सखाराम देवरे, आर. आर. जाधव, गोविंदनगर ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष भालचंद्र रत्नपारखी, ओमप्रकाश शर्मा, बाळासाहेब देशमुख, अशोक देवरे, दिलीप निकम, नवे नाशिक ज्येष्ठ नागरीक मंडळाचे अध्यक्ष देवराम सैंदाणे, बापूराव पाटील, डॉ. शशीकांत मोरे, डॉ. राजाराम चोपडे, विनोद पोळ, श्रीकांत नाईक, मनोज पाटील, मनोज वाणी, दिलीप दिवाणे, अशोक पाटील, बाळासाहेब राऊतराय, शैलेश महाजन, बाळासाहेब तिडके, मगन तलवार, जिजाऊ हास्य क्लबच्या सदस्या छाया नवले, भारती देशमुख, रंजना सुर्वे, कांचन महाजन, सुरेखा बोंडे, सुनीता उबाळे, मीना टकले, वंदना पाटील, रूपाली मुसळे, दीपक दुट्टे, राहुल काळे, पुरुषोत्तम शिरोडे, तेजस अमृतकर, हरिष काळे, प्रथमेश पाटील आदींसह नागरिकांनी ही मागणी केली आहे. दि. १५ डिसेंबर २०२२ रोजी याबाबतचे निवेदन आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांना देण्यात आले आहे.


Previous Post

सावधान! परदेशातून येणाऱ्या प्रवाशांमध्ये आढळतोय कोरोना; आज इतक्या बाधितांची नोंद, बघा, कुठे किती आढळले?

Next Post

कर्जत-जामखेड तालुक्यात होणार औद्योगिक वसाहत; उद्योगमंत्र्यांची विधानसभेत माहिती

Next Post

कर्जत-जामखेड तालुक्यात होणार औद्योगिक वसाहत; उद्योगमंत्र्यांची विधानसभेत माहिती

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 28, 2023

राज्यातील या ५ शहरांमध्ये सुरू होणार लू लू मॉल तर येथे सुरू होणार अन्न प्रक्रिया उद्योग

March 28, 2023

जालना, अंबड शहर पाणीपुरवठा योजनेबाबत झाला हा महत्वाचा निर्णय

March 28, 2023
प्रातिनिधीक फोटो

पुण्याच्या पाणी पुरवठ्याबाबत पालकमंत्र्यांनी दिले हे निर्देश

March 28, 2023

नागरिकांना आता कमी दरात मिळणार वाळू… असा आहे सरकारचा मेगाप्लॅन…

March 28, 2023

पठाणच्या अभूतपूर्व यशानंतर शाहरुख खानने घेतली ही आलिशान कार… एवढी आहे तिची किंमत.. अशी आहेत वैशिष्ट्ये

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group