India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशिक जिल्ह्यात अर्ध्या तिकीट योजनेचा इतक्या लाख महिलांनी घेतला लाभ

India Darpan by India Darpan
April 19, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महिला प्रवाशांचे हित लक्षात घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या अर्ध टिकीट योजनेचा लाभ महिन्याभरात जिल्ह्यातील २१ लाख महिलांनी घेतला आहे.लाभार्थींच्या तुलनेत जिल्ह्यातील कळवण डेपो अव्वल असून शेवटचा क्रमांक पेठ डेपोचा आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या अर्ध्या टिकीटाच्या योजनेमुळे जिल्ह्यातील एकवीस लाख महिला लाभार्थींचे सुमारे सव्वा सहा कोटी रूपये वाचले असून हे मुख्यमंत्री शिंदे यांचे मोठे यश असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.

राज्यातील महिलांचा एस.टी प्रवास कमीत कमी टिकीट दरात व्हावा अशी मागणी विविध महिला संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून सतत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे होत होती.महिला संघटनांकडून होत असलेली मागणी न्यायिक असल्याने महिनाभरापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील महिलांना टिकीट दरात ५० टक्क्यांची सवलत जाहीर केली आहे. शासनाच्या या निर्णयाचे राज्यातील महिला वर्गाने जंगी स्वागत केले होते.

गेल्या महिन्यात १७ मार्चपासून एस.टी प्रवासासाठी महिलांना अर्ध्या टिकीट योजना सुरू करण्यात आली होती.महिन्याभरात या योजनेचा लाभ जिल्ह्यातील २१ लाख महिला प्रवाशांना झाल्याचे समोर आले आहे.पैकी नाशिक-१ डेपोतील ११८९०७, नाशिक-२ डेपोतील २२०५४५, मालेगांव डेपोतील १८८७३४,मनमाड डेपोतील ९५८१७, सटाणा डेपोतील २३७१११,सिन्नर डेपोतील २२७८८६, नांदगाव डेपोतील १४९१५७, ईगतपुरी डेपोतील १०४२५५, लासलगांव डेपोतील १४२१४७, कळवण डेपोतील २७२७६५, पेठ डेपोतील ९५९३५, येवला डेपोतील १०७१२०, पिंपळगांव डेपोतील १४५५९२ महिला प्रवाशांनी लाभ घेतल्याची माहिती जिल्हा ‍नियंत्रक (डी.सी) अरूण सिया यांनी दिली आहे.

सर्वाधिक लाभ कळवण डेपोतून प्रवास करणाऱ्या महिलांनी घेतला असून त्या खालोखाल सिन्नर डेपोतून प्रवास करणाऱ्या महिलांनी घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अर्धे टिकीट योजनेमुळे महिन्याभरात जिल्ह्यातील महिला प्रवाशांचे सुमारे सव्वा सहा कोटी रूपये वाचले असून सरकारच्या निर्णयाचे हे मोठे यश असल्याची माहिती खासदार गोडसे यांनी दिली आहे.

Nashik MSRTC ST Bus Half Ticket Women Benefit


Previous Post

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

Next Post

अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांनो, इकडे लक्ष द्या! हे करा, …अन्यथा मदत मिळणार नाही

Next Post

अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांनो, इकडे लक्ष द्या! हे करा, ...अन्यथा मदत मिळणार नाही

ताज्या बातम्या

ओडिशातील भीषण रेल्वे अपघातात मृतांचा आकडा २४०, तर जखमींची संख्या १ हजारावर

June 3, 2023

रेल्वेचा एवढा भीषण अपघात का आणि कसा झाला? तो टाळता आला असता का?

June 3, 2023

ड्रायव्हर आजारी पडल्याने अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने चालवली बस (व्हिडिओ)

June 3, 2023

शरद पवार-गौतम अदानी भेटीने उंचावल्या सर्वांच्या भुवया; ही आहे बातमी मागची बातमी

June 3, 2023

झंझटच मिटली… कोरड्या हवामानात आणि अत्यल्प पाण्यात टिकणार ही वनस्पती.. शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान

June 3, 2023
विमानसेवेचे प्रातिनिधीक छायाचित्र

विमान तिकीटावर ४० टक्के, हॉटेल बुकींग्जवर ६० टक्के सूट; असा घेता येईल लाभ

June 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group