नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक महानगरापालिकेच्या आगामी निवडणुकीत ६६ पेक्षाही जास्त नगरसेवक निवडून पुन्हा भाजपचीच सत्ता येईल असा दावा महापौर सतीश कुलकर्णी यांनी केला. ते म्हणाले की, गेल्या पाच वर्षात इतके काम केले आहे. त्यामुळे जनता पुन्हा भाजपलाच निवडेल. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या प्रश्नावर थेट उत्तर न देता काम करणा-यांनाच जनता संधी देते असे सांगून चिमटा काढला.
इंडिया दर्पण वेब न्यूज पोर्टलने अवघ्या १७ महिन्यातच तब्बल ३ कोटी २५ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे महापौर कुलकर्णी हे शुभेच्छा देण्यासाठी इंडिया दर्पणच्या कार्यालयात आले होते. त्यावेळी त्यांची थेट मुलाखत इंडिया दर्पणचे संपादक गौतम संचेती यांनी घेतली. या मुलाखतीत महापौर कुलकर्णी यांनी पाच वर्षात केलेल्या कामांची माहिती दिली. त्याचप्रमाणे आपण पद घेतल्यानंतर अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्याचे त्यांनी सांगितले. आगामी निवडणुका या विकास कामांवरच आम्ही लढू असेही त्यांनी सांगितले. प्रभाग रचनेच्या प्रश्नावर बोलतांना ते म्हणाले की, प्रभाग रचनेत बदलामुळे भाजपला काही फरक पडला नाही. ही रचना कशी पण असली तरी जनता भाजपला संधी देईल. कारण, या पाच वर्षात इतकी कामे झाले आहे.
त्याबाबत अद्याप ठरवले नाही
महापौर झाल्यानंतर पुन्हा नगरसेवक होणे मनाला पटत नाही. पण, अद्याप आगामी निवडणुकीबाबत मी अजूनही काही ठरवले नाही. त्यामुळे आगामी काही दिवसात त्याबाबत चर्चा करुन निर्णय घेऊ.
ही संपूर्ण मुलाखत बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://fb.watch/a_lto1_afY/