India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

आणखी एक गुडन्यूज! नाशिकला आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिक्कामोर्तब; थेट परदेशी उड्डाणांचा मार्ग मोकळा

India Darpan by India Darpan
December 30, 2022
in संमिश्र वार्ता
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिककरांसाठी नववर्षाच्या स्वागताला आणखी एक मोठी गुडन्यूज आहे. ती म्हणजे ओझर येथील नाशिक विमानतळावर इमिग्रेशन सुविधा पूर्ण झाली आहे. त्यास केंद्रीय गृहमंत्रालयाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता नाशिक हे खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय विमानतळ बनले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवेचा मार्ग मोकळा झाला आहे. आगामी काळात नाशिक विमानतळावरुन थेट आंतरराष्ट्रीय सेवा सुरू होणार आहे.

नाशिक विमानतळाचे व्यवस्थापन हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)कडे आहे. राज्य सरकार आणि एचएएल यांनी संयुक्त पद्धतीने नाशिक विमानसेवेला वेग दिला आहे. विमानतळावरील आंतरराष्ट्रीय उड्डाण ऑपरेशन्स हाताळण्यासाठी एचएएलने २ कोटी रुपयांहून अधिक खर्च करून  पायाभूत सुविधा तयार केल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मंजुरीनंतर इमिग्रेशन चेकपॉईंटसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांवर नोव्हेंबर २०२० मध्ये काम सुरू झाले. मुंबईच्या इमिग्रेशन ब्युरोने आंतरराष्ट्रीय आगमन आणि निर्गमन, सीमाशुल्क कार्यालय, इमिग्रेशन काउंटर इत्यादी सुविधा उभारण्यासाठी मार्गदर्शन केले. एचएएलने विमानतळावरील देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विंग वेगळे केले आहेत आणि दोन्ही विभागांवर स्वतंत्रपणे प्रवेश आणि निर्गमन विभाग तयार केले आहेत. इमिग्रेशन ब्युरोने अंतिम तपासणी केली आहे. त्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने इमिग्रेशन चेक पॉइंट्स कार्यान्वित करण्यास मान्यता दिली आहे.  एचएएलच्या कसोशीच्या प्रयत्नांमुळे हे यशस्वी झाले आहे.

नाशिक ग्रामीण पोलिस
नाशिक ग्रामीण पोलिसांकडून आता विमानतळाच्या ठिकाणी पोलिसांची नियुक्ती करण्यात येईल. जिल्हा पोलिस अधिक्षक शहाजी उमप यांच्यावतीने येत्या काही दिवसातच यासंदर्भातील निर्णय अपेक्षित आहे. पोलिसांची नियुक्ती झाल्यानंतर इमिग्रेशन विभाग कार्यरत होईल. तसेच, या पोलिस कर्मचाऱ्यांचा पगार केंद्रीय गृहमंत्रालयाकडून केला जाणार आहे.

असा होणार फायदा
इमिग्रेशन सुविधा कार्यन्वित झाल्याने आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे थेट आंतरराष्ट्रीय विमाने नाशिकला येतील आणि येथून जाऊ शकतील. मुंबई विमानतळावर अनेकदा सिग्नलची वाट पाहणारी आंतरराष्ट्रीय विमाने अहमदाबादला वळविली जातात. ही विमानेसुद्धा नाशिकला येऊ शकणार आहेत. तसेच, नाशिकला पार्किंगची सुविधा उपलब्ध असल्याने नाईट पार्किंग आणि दिवसाही विमाने पार्किंग करण्याठी येऊ शकतील. या सुविधेचा नाशिकच्या कार्गो सेवेलाही लाभ होणार आहे. नाशकातील कृषीमाल आणि अन्य उत्पादनांच्या निर्यातीलाही फायदा होणार आहे. तसेच, मुंबई विमानतळावर कार्गो विमानांनाही मोठी प्रतीक्षा करावी लागते. ही विमानेही ओझरला येऊ शकणार आहेत.

Nashik is Now International Airport Immigration Facility Approved
Ozar Ojhar Airport Air Service Flight Aviation


Previous Post

आदिवासी युवकांसाठी सुरू झालेला ‘नवचेतना स्वयंदीप आत्मनिर्भरता कक्ष’ आहे तरी काय?

Next Post

नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणूक : अशी असेल आचारसंहिता, एवढे आहेत मतदार

Next Post

नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणूक : अशी असेल आचारसंहिता, एवढे आहेत मतदार

ताज्या बातम्या

या व्यक्तींना आजचा दिवस आहे सुखप्राप्तीचा; जाणून घ्या, बुधवार, २९ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – बुधवार – २९ मार्च २०२३

March 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – जेव्हा पत्नीचा अपघात होतो

March 28, 2023

कार्बन फूटप्रिंट म्हणजे काय? ते कसे मोजतात? त्याचा आणि आपला काय संबंध? घ्या जाणून अतिशय सोप्या शब्दात…

March 28, 2023
सग्रहित फोटो

ठाकरे सरकार नेमके कसे कोसळले… कशी होती व्यूहरचना… तानाजी सावंतांनी अखेर सगळं स्पष्टच सांगितलं…

March 28, 2023

शिंदेंनी विचारले, ‘वाचू का?’ फडणवीस म्हणाले, ‘नाही, गरज नाही’; पत्रकार परिषदेचा व्हिडिओ व्हायरल

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group