India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणूक : अशी असेल आचारसंहिता, एवढे आहेत मतदार

India Darpan by India Darpan
December 30, 2022
in संमिश्र वार्ता
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ द्विवार्षिक निवडणूक 2023 जाहिर झाली आहे. नाशिक, अहदमदनगर, धुळे, जळगाव व नंदूरबार जिल्ह्यात निवडणूक आदर्श आचारसंहिता तात्काळ प्रभावाने लागु करण्यात आलेली आहे. नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणूक प्रक्रिया पार पाडतांना निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे ततोंत पालन करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिल्या.

महाराष्ट्र विधानपरिषद नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी बाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे बोलत होते. यावेळी पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील, जिल्हाधिकारी गंगाथरन.डी, उपायुक्त रमेश काळे, उपायुक्त प्रज्ञा बडे-मिसाळ, उपायुक्त उन्मेष महाजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे , उपजिल्हाधिकारी स्वाती थविल व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

दूरदृश्यप्रणालीद्वारे अहमदनगर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी धुळे जलज शर्मा, जिल्हाधिकारी जळगाव अमन मित्तल, जिल्हाधिकारी नंदूरबार मनीषा खत्री उपस्थित होते. विभागीय आयुक्त श्री.गमे पुढे म्हणाले की, लोकसभा व विधानसभेप्रमाणे आचारसंहिता राहणार असून अधिकाऱ्यांनी त्याप्रमाणे कामकाज करावे. गरजेनुसार मतदान केंद्र वाढविता येणार आहे. अंतिम मतदार यादीच्या प्रती नाशिक विभागातील सर्व राजकीय पक्षांना वितरीत करुन नोंदी घेण्यात याव्यात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र विधानपरिषद नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणूक-2023 साठी विभागीय आयुक्त निवडणूक निर्णय अधिकारी असून आणि विभागातील पाचही जिल्हाधिकारी तसेच उपायुक्त (सामान्य प्रशासन) हे सहायक निवडणूक अधिकारी असणार आहेत. नाशिक विभागात एकूण 338 मतदार केंद्र असून 2 लाख 58 हजार 351 पदवीधर मतदार आहेत. 12 जानेवारी,2023 पर्यंत ऑनलाईन मतदार नोंदणी करता येणार असल्याने ज्यांची नोंदणी बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहनही श्री गमे यांनी यावेळी केले.

Nashik Graduate Constituency Election COC and Voters


Previous Post

आणखी एक गुडन्यूज! नाशिकला आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिक्कामोर्तब; थेट परदेशी उड्डाणांचा मार्ग मोकळा

Next Post

राजू शेट्टी करणार पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरासमोर आंदोलन

Next Post

राजू शेट्टी करणार पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरासमोर आंदोलन

ताज्या बातम्या

चित्रपट शुटींगवेळी अभिनेता अक्षय कुमार जखमी

March 24, 2023

सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; आता हा सुद्धा गुन्हा मानला जाणार

March 24, 2023

येत्या १ एप्रिलपासून बदलणार हे सर्व नियम… आजच घ्या जाणून… अन्यथा…

March 24, 2023

करौली बाबाच्या अनेक बाबी उघड… दररोज करोडोंची उलाढाल.. आश्रमात आहेत या शाही सुविधा… अॅम्ब्युलन्सचा यासाठी होतो वापर…

March 24, 2023

पुणेरी जाऊ द्या… आता या सोलापुरी बॅनरची जोरदार चर्चा… असं काय आहे त्यात? तुम्हीच बघा

March 24, 2023

बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी… येथे निघाल्या तब्बल ५३६९ जागा… येथे आणि असा करा अर्ज

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group