India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशिकच्या घाटन देवी सहकारी औद्योगिक वसाहत प्रकरणी सहकारमंत्र्यांनी दिले हे निर्देश

India Darpan by India Darpan
March 13, 2023
in राज्य
0

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्ह्यातील घाटन देवी सहकारी औद्योगिक वसाहतीचे गृहनिर्माण सहकारी संस्थेत बेकायदेशीर रूपांतर करण्यात आले आहे. तसेच 8 मजूर बांधकाम सहकारी संस्थांच्या कार्यक्षेत्रात बदल आणि अन्य अनुषंगाने संबंधित तत्कालीन सहाय्यक निबंधकांना सक्तीच्या रजेवर पाठवून सात दिवसांच्या आत चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे सहकार मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.

सदस्य नरेंद्र दराडे यांनी विधानपरिषदेत उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देतांना मंत्री श्री.सावे बोलत होते. मंत्री श्री.सावे यांनी सांगितले की, संबंधित अधिकाऱ्याची सहकार आयुक्तामार्फत चौकशी सुरु आहे. याबाबत सात दिवसांच्या आत अहवाल प्राप्त करून पुढील कारवाई केली जाईल. सदर अधिकाऱ्यास सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य अभिजित वंजारी, भाई जगताप, जयंत पाटील, सतेज पाटील यांनी सहभाग घेतला.

राज्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील पदे भरण्याची कार्यवाही सुरू – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन
पुण्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अतिविशेषोपचार विषयात अध्यापकीय संवर्गात सहयोगी प्राध्यापक , सहायक प्राध्यापक तसेच क व ड संवर्गातील १२१ पदे भरण्यात आली आहेत. तसेच इतर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी विधानपरिषदेत दिली. राज्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील सुविधांबाबत सदस्य डॉ. वजाहत मिर्ज़ा यांनी लक्षवेधी मांडली होती. यास उत्तर देताना मंत्री श्री. महाजन बोलत होते.

मंत्री श्री.महाजन म्हणाले की, पुण्यातील ससून रूग्णालयात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता विविध आजारांच्या उपचारासाठी मोठ्या प्रमाणात रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यात आलेले आहे. अतिविशेषोपचार विषयात अध्यापकीय संवर्गातील सहयोगी प्राध्यापक पदांच्या २ व सहायक प्राध्यापक पदांची ७ पदे मंजूर आहेत. त्याचप्रमाणे गट-क व गट-ड संवर्गात १२१ पदे भरण्यात आली आहेत.

अतिविशेषोपचार विषयातील रुग्णसेवेची निकड तसेच पदव्यत्तर विद्यार्थी संख्या वाढविण्याच्या दृष्टीने मंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर येथील विशेषोपचार विषयातील काही अध्यापकीय पदांचे स्थानांतरण व रुपांतरण तसेच काही पदे समर्पित करून ही पदे नव्याने निर्माण करण्यात येणार आहेत.

त्याचप्रमाणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालय, नागपूर या संस्थेकरिता गट-अ ते गट-ड मधील एकूण १३५ पदे निर्माण करण्यात आली आहेत. तसेच केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागामार्फत प्रधानमंत्री स्वास्थ सुरक्षा योजनांतर्गत राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अकोला, यवतमाळ, लातूर व औरंगाबाद येथे अतिविशेषोपचार रुग्णालये सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर ४ अतिविशेषोपचार रुग्णालयांकरिता एकूण १८४७ पदे आवश्यक असून प्रथम टप्याकरिता आवश्यक असलेली गट-अ ते गट-ड संवर्गात एकूण ८८८ पदे निर्माण करण्यात आली आहे. उर्वरित द्वितीय व तृतीय टप्प्यासाठी आवश्यक असलेली अनुक्रमे ५५३ व ४०६ तसेच तांत्रिक संवर्गातील गट-क व गट-ड मधील अतिरिक्त २४८ अशी एकूण १२०७ पदे निर्माण करण्यात येणार आहेत.

अतिविशेषोपचार विषयातील अध्यापकीय वर्गातील प्राध्यापक-९, सहयोगी प्राध्यापक- १३ व सहायक प्राध्यापक-५९ इतक्या उमेदवारांना विविध अतिविशेषोपचार रुग्णालयात नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात आले असल्याची माहितीही मंत्री श्री.महाजन यांनी यावेळी दिली. यावेळी सदस्य सचिन अहिर, अभिजित वंजारी, जयंत पाटील, किरण सरनाईक, भाई जगताप यांनी यावेळी चर्चेत सहभाग घेतला.

nashik ghatan devi illegal cooperative minister order


Previous Post

नाशिक विमानसेवेचे वेळापत्रक हवंय? हे घ्या… तिकीट बुकींगसाठी येथे साधा संपर्क

Next Post

पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत राज्य सरकारची ही आहे भूमिका

Next Post

पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत राज्य सरकारची ही आहे भूमिका

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 28, 2023

राज्यातील या ५ शहरांमध्ये सुरू होणार लू लू मॉल तर येथे सुरू होणार अन्न प्रक्रिया उद्योग

March 28, 2023

जालना, अंबड शहर पाणीपुरवठा योजनेबाबत झाला हा महत्वाचा निर्णय

March 28, 2023
प्रातिनिधीक फोटो

पुण्याच्या पाणी पुरवठ्याबाबत पालकमंत्र्यांनी दिले हे निर्देश

March 28, 2023

नागरिकांना आता कमी दरात मिळणार वाळू… असा आहे सरकारचा मेगाप्लॅन…

March 28, 2023

पठाणच्या अभूतपूर्व यशानंतर शाहरुख खानने घेतली ही आलिशान कार… एवढी आहे तिची किंमत.. अशी आहेत वैशिष्ट्ये

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group