नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात पाऊस ठाण मांडून आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांची पातळी लक्षणीयरित्या वाढली आहे. धरणक्षेत्रात सुरू असलेल्या संततधारेमुळे अनेक धरणांमधून सध्या पाणी सोडण्यात येत आहे. गंगापूर धरणातील विसर्गही वाढविण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे गोदाकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर धरण क्षेत्रात तसेच पाणलोट क्षेत्रात पावसाची संतत धार चालू आहे. पावसाचा जोर असल्याने गंगापूर धरण पूर विसर्ग दुपारी १ वाजेपासून ५ हजार क्युसेकस करण्यात आला आहे. तसेच पावसाचा जोर राहिल्यास विसर्ग टप्या टप्याने वाढवण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. जिल्ह्यातील धरणांमधून होणारा विसर्ग असा
दारणा – १०,५६२
मुकणे – १,०८९
कडवा – ३,३४८
वालदेवी – ४०७
गंगापूर – ५,०००
आळंदी – ४४६
भोजापूर – ९९०
पालखेड – ५,११२
नांदूर मध्यमेश्वर बंधारा – ३१,८४९
होळकर पुलाखालून वाहणारे पाणी – ७,८३०
(सर्व आकडे क्युसेक्समध्ये)
Nashik Dam Water Discharge Rain Flood
Godavari River