नाशिक – शहरातील वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या तीन तरूणांनी रविवारी (दि.१२) गळफास लावून घेत आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या तिघांच्या नैराश्याचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी इंदिरानगर व गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
पाथर्डी फाटा परिसरातील जयवंत भानुदास पाटील (३८ रा.आनंदवन अपा.प्रशांतनगर) यांनी सकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरात लहान मुलांसाठी बांधलेल्या दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यु झाला. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी सतिष कचवे यांनी दिलेल्या खबरीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.
दुसरी घटना कॉलेजरोड भागात घडली. दीपक राजू पगार (२८ रा.विनायक कार्स मॉल,थत्तेनगर) या युवकाने रविवारी दुपारच्या सुमारास अज्ञात कारणातून मॉलच्या वॉचमन रूममधील पंख्याच्या हुकाला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यु झाला. अजय दुवा यांनी याबाबत खबर दिली.
तिसरी घटना औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात घडली. राजेंद्र सुरेश भोई (२८ रा.दत्तकृपा निवास,इंदिरा गांधी शाळेसमोर) या तरूणाने रविवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात पंख्यास बेडसिट बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. आतून दरवाजा लावलेला असल्याने कुटूंबियांनी तो तोडला असता ही घटना उघडकीस आली. नाना भोई यांनी याप्रकरणी पोलीसांना खबर दिली. दोन्ही घटनांप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास अनुक्रमे हवालदार खुळात व पोलीस नाईक हिंडे करीत आहेत.