India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

सागर स्वीटमधील ‘त्या’ चोरीचा उलगडा; नाशिक पोलिसांनी परराज्यात जाऊन लावला असा छडा

India Darpan by India Darpan
December 26, 2022
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील गंगापूर रोडवरील नामांकित सागर स्विट या दुकानात झालेल्या घरफोडीचा उलगडा झाला आहे. यासंदर्भात नाशिक पोलिसांनी थेट परराज्यात जाऊन या गुन्ह्याचा शोध लावला आहे. या दुकानात काम सोडून गेलेला नोकरच या गुन्ह्याचा मास्टरमाईंड असल्याचे स्पष्ट झाले आहे. या नोकरानेच परप्रांतीय साथीदाराच्या मदतीने लाखोंच्या रोकडवर डल्ला मारला आहे. उत्तर प्रदेशात त्याच्या साथीदारास बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. संशयिताच्या ताब्यातून २२ लाख ७० हजाराची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा मास्टरमाईंड लवकरच पोलिसांच्या हाती लागेल असा विश्वास पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी व्यक्त केला आहे.

बच्छाव यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, अखिलेश कुमार मनिराम (२५ रा.कटैय्या जि.बाराबंकी उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून विवेककुमार उर्फ अंजनी रामेश्वरप्रसाद हा संशयित नोकर उत्तरप्रदेश पोलिसांच्या ताब्यात आहे. याप्रकरणी रतन चौधरी यांनी तक्रार दाखल केली होती. चौधरी यांचे शहरातील वेगवेगळ््या भागात सागर स्विट नावाचे अनेक मिठाईचे दुकाने आहेत. मुख्यशाखा असलेल्या वर्दळीच्या गंगापूर रोड भागात गेल्या रविवारी (दि.१८) ही घटना घडली होती. दुसºया मजल्यावरील गच्चीतील दरवाजाचा लॉच लॉक तोडून चोरट्यांनी तब्बल ३५ लाखाची रोकड लांबविली होती. प्रारंभी अंदाजे १५ लाखाची रोकड चोरीस गेल्याचे सांगितले जात होते. मात्र चौधरी यांच्या बाहेरगावी गेलेल्या भावानेही शहरातील दुकानांमधील जमा केलेली २० लाखाची रोकड मुख्यशाखेतील कार्यालयाते ठेवल्याचे समोर आल्याने याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात ३५ लाखाच्या घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

इमारतीच्या खाली मुख्यशाखा असलेले दुकान व वरिल मजल्यावर या फर्मचे कार्यालय असून, या कार्यालयास लागूनच नोकरांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील विविध भागात असलेल्या दुकनांमधील दिवसभराचा गल्ला जमा करून तो येथेच ठेवला जात होता. घरफोडीप्रसंगी चोरट्यांनी सीसीटिव्ही यंत्रणा निकामी केल्याने पोलिसांपुढे तपासाचे मोठे आव्हान ठाकले होते. युनिय १ चे वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ आणि गंगापूर पोलिस ठाण्याचे रियाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रविण सुर्यवंशी,जमादार रविंद्र बागुल हवालदार येवाजी महाले,संदिप भांड पोलिस नाईक विशाल देवरे,राहूल पालखेडे योगेश चव्हाण आदींच्या पथकाने या गुह्याचा शोध घेतला.

पोलिसांनी रेल्वे स्टेशन आणि बस थांबा पिंजून काढला. तसेच दुकानात कामावर असलेल्या आणि काम सोडून गेलेल्यां नोकरांची माहिती मिळवत पोलिसांनी परिसरातील रिक्षाचालकांची चौकशी मोहिम हाती घेतली. याचवेळी कुठलाही धागादोरा नसतांना दुकानापासून काही अंतरावर असलेल्या रिक्षा थांब्यावरील सीसीटिव्हीत काही दिवसांपूर्वीच काम सोडून गेलेल्या विवेककुमार कैद झाल्याने या घटनेचा उलगडा झाला. पोलिस पथकाने उत्तरप्रदेश गाठून नोकराच्या साथीदार अखिलेशकुमार मनिराम यास बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्या घरझडतीत २२ लाख ७० हजाराची रोकड हाती लागली असून घटनेनंतर उत्तरप्रदेशात पोहचलेला मास्टरमाईंड संशयित नोकर नाशिक पोलिसांचा तपास भरकटविण्यासाठी सफदरगंज पोलिसांच्या स्वाधिन झाल्याचा अंदाज बांधला जात आहे. बेकायदा पिस्तूल बाळगल्याचा त्याच्यावर आरोप असून बाराबंकी न्यायालयाने त्यास कोठडी सुनावली आहे. लवकरच त्याचा ताबा घेतला जाणार असल्याची माहिती उपायुक्त बच्छाव यांनी दिली.

Nashik Crime Sagar Sweet Theft 1 Arrested
City Police Investigation 35 Lakh


Previous Post

विजेचा लंपडाव….बागलाणमध्ये शेतकऱ्यांची कैफियत ऐकतांना तहसीलदारच झाले भावुक

Next Post

तब्बल १७.५० कोटींची बोली… IPLमध्ये आजवरची सर्वाधिक… कॅमरुन ग्रीन आहे तरी कोण?.. मुंबई इंडियन्सने का खरेदी केले?

Next Post

तब्बल १७.५० कोटींची बोली... IPLमध्ये आजवरची सर्वाधिक... कॅमरुन ग्रीन आहे तरी कोण?.. मुंबई इंडियन्सने का खरेदी केले?

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

आज या व्यक्तींनी कुठलाही व्यवहार करु नये; जाणून घ्या, मंगळवार, २१ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 20, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – २१ मार्च २०२३

March 20, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – युवक आणि युवती

March 20, 2023

ओले खोबरे खावे की सुके? नारळाच्या पाण्याचे आहेत एवढे सारे फायदे; आहारात नक्की समावेश करा

March 20, 2023

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गारपिट नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत अंतिम करणार – मुख्यमंत्री

March 20, 2023
संग्रहित फोटो

अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या ठाण्यातील कार्यालयात चोरी; हे सर्व सामान लंपास

March 20, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group