नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- फोरच्युनर कारने पाठलाग करीत महिलेचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. सावरकरनगर ते अशोकनगर मार्गावर हा प्रकार घडला असून भामट्यांनी अश्लिल हाव भाव करीत महिलेची छेड काढली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रतिक क्षिरसागर व प्रतिक मदन अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. तक्रारदार पीडिता व तिची मैत्रीण गुरूवारी (दि.५) रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास सातपूर औद्योगीक वसाहतीतील अशोकनगर भागात जात असतांना हा प्रकार घडला.
सावरकरनगर येथून दोन्ही महिला क्रेटा कारमधून प्रवास करीत असतांना फोरच्युनर कारमधून आलेल्या दोघांनी त्यांची छेड काढली. खिडकीची काच उघडून दोघांनी अश्लिल हाव भाव केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक अहिरराव करीत आहेत.