नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– घरात कुणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी घरासमोर गोणीमध्ये भरूण ठेवलेला वीस क्विंटल तांदूळ चोरून नेला. या घटनेत शेतक-याचे सुमारे सव्वा लाख रूपयांचे नुकसान झाले असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविकिरण नानाजी पगारे (रा.राजवाडा म्हसरूळ) यांनी फिर्याद दिली आहे. पगारे यांची आडगाव म्हसरूळ लिंकरोडवरील पगारे वस्ती भागात शेती असून यंदा त्यांनी तांदूळाची लागवड केली होती. शेतात पिकलेला तांदूळाच्या गोण्या भरून शेतातील घराबाहेर ठेवण्यात आल्या होत्या.
गेल्या ९ जानेवारी रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी शेतातील घरात कुणी नसल्याची संधी साधत घराबाहेरील सुमारे एक लाख २० हजार रूपये किमतीच्या ४२ गोणी तांदूळ चोरून नेल्या. अधिक तपास हवालदार वसावे करीत आहेत.