नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– दारू पिण्यास पैसे दिले नाही या कारणातून दाम्पत्याने एका तरूणास बेदम मारहाण केल्याची घटना भारतनगर येथे घडली. या घटनेत तरूणाच्या गळयास कश्याच्या तरी सहाय्याने दुखापत करण्यात आली असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वर दाते व त्याची पत्नी (रा.दोघे शिवाजीवाडी भारतनगर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत सनी मनोज मोहनकर (२० रा.म्हाडा बिल्डींग,भारतनगर) या युवकाने फिर्याद दिली आहे. मोहनकर शुक्रवारी (दि.१६) दुपारी शिवाजीवाडी भागातून आपल्या घराकडे पायी जात असतांना ज्ञानेश्वर दाते याने त्याची वाट अडविली. यावेळी त्याने मला दारू पाज असा आग्रह धरला असता मोहनकर याने त्यास उद्या पाजतो असे सांगितल्याने ही घटना घडली.
संतप्त दाते याने मोहनकर यास शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी त्याच्या पत्नीनेही मोहनकर यास मारहाण केली असून या घटनेत तरूणाच्या गळय़ास कश्याच्या तरी सहाय्याने दुखापत करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार शिंदे करीत आहेत.