नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अनधिकृतपणे अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्या विवेक राणेला पोलिसांनी गजाआड केले आहे. या कारवाईत त्याच्याकडून दोन कार, ट्रॅक्टर आणि टेम्पो असा १३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. राणे यांच्या विरोधात तीन गुन्हे दाखल झाले आहेत. देवळा येथील फिर्यादी अमोल अहिरे सावकार राणे याच्याकडून दीड लाख रुपये व्याजाने घेतले होते. दीड लाखाच्या बदल्यात एक लाख ८० हजार रुपये वसूल करूनही सावकार राणे याने फिर्यादी देवरे यांची सहा लाख रुपये किमतीची बलेनो कार बळजबरीने घेऊन गेले. तसेच देवळा येथील शेतकरी कैलास देवरे याचाही सात लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर सावकार राणे याने ओढून आणून त्याची परस्पर विक्री केली. या दोन्ही घटनांमध्ये फिर्यादीच्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात राणे यांच्या विरोधात अवैध सावकारी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने सापळा रचून सावकार राणे याला पाथर्डी फाटा येथून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडून अधिक तपास केला असता या गुन्ह्यातील फरार संशयित आरोपी निलेश जाधव यांच्या विरोधातही गुन्हा दाखल असून त्याचा शोध घेतला जात आहे. सदरची कारवाई अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन फुलपगारे सचिन करंजे अनिल गाढवे, स्वप्निल जुद्रे यांच्या पथकाने केली चौकट : अवैध सावकार त्रास देत असतील तर पोलिसांना कळवा गेल्या काही दिवसांपासून अवैध सावकारीच्या अनेक घटना उघडकीस आले असून पोलिसांकडून अशा आर्थिक फसवणुकीच्या घटनांमधील पीडित नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी मोहीम उघडली आहे. अवैध सावकारीने पीडित असलेल्या नागरिकांनी अंबड पोलिसांकडे तक्रारी करण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी केले.
याप्रकरणी अंबड पोलीस अधिक तपास करत असून आणखी काही तक्रारी प्राप्त होण्याची शक्यता आहे. या गुन्ह्यातील संशयित फरार आरोपी निलेश जाधव याचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी दिली.