नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बंद घराची कडी उघडून चोरट्यांनी सुमारे अडीच लाखाचा ऐवज चोरून नेला. पखालरोड भागात भरदिवसा घडलेल्या या घटनेत भामट्यांनी सोन्याच्या बांगड्या आणि मोबाईलवर डल्ला मारला असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इम्तीयाज नुरमोहम्मद शेख (रा.पखालरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शेख कुटुंबिय गुरूवारी (दि.२०) अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली.
अज्ञात चोरट्यांनी शेख यांच्या बंद घराची कडी उघडून कपाटात ठेवलेल्या सोन्याच्या बांगड्या व दोन मोबाईल असा सुमारे २ लाख ६५ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार गाढवे करीत आहेत.