नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रस्त्याने पायी जाणा-या तरुणाच्या हातातील मोबाईल रिक्षातून प्रवास करणा-या भामट्यांनी हिसकावून नेल्याचा प्रकार औद्योगीक वसाहतीतील कामगारनगर भागात घडली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेश राजेंद्रप्रसाद कोरी (रा. कामगारनगर, सातपूर) या युवकाने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. कोरी बुधवारी (दि.१२) रात्री नऊ वाजेच्या सुमारास मित्र महेश कोरी याच्या समवेत आपल्या घराकडे रस्त्याने पायी जात असतांना ही घटना घडली.
कौशल्या पेट्रोल पंपाजवळून दोघे मित्र पायी जात असतांना फोनवर बोलत चालणा-या राजेंश कोरी याच्या हातातील मोबाईल एमएच १५ एफयू १९६० या रिक्षातून आलेल्या त्रिकुटाने हिसकावून नेला. अधिक तपास हवालदार गणेश घारे करीत आहेत.