नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पार्क केलेली वकिलाची कार अज्ञात समाजकंटकांनी पेटवून दिली. या घटनेत कारचे मोठे नुकसान झाले असून या प्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अॅड. पवन सोमनाथ भगत (रा.बजरंगवाडी,नाशिक पुणारोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. भगत यांची स्विफ्ट कार (एमएच १५ एचजी ५७७८ ) शुक्रवारी (दि.३१) रात्री घर परिसरात लावलेली असतांना ती अज्ञात समाजकंटकांनी नुकसान करण्याच्या उद्देशाने ज्वलनशिल पदार्थ टाकून पेटवून दिली. या घटनेत कारचे मोठे नुकसान झाले असून अधिक तपास हवालदार म्हैसधुणे करीत आहेत.
महिलेची सोन्याची पोत चोरट्यानी केली लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बस प्रवासात महिलेची सोन्याची पोत चोरट्यानी हातोहात लांबविली. ही घटना साक्री ते नाशिक प्रवासात घडली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कमलेश शशिकांत देशमुख (रा.वृंदावननगर,आडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. देशमुख गेल्या गुरूवारी (दि.३०) साक्री येथून आपल्या आईला सोबत घेवून नाशिकला आले. नंदूरबार नाशिक (एमएच १४ बीटी ४५१०) या बसमधून मायलेकांनी प्रवास केला. बसमधून प्रवास करीत असतांना अज्ञात चोरट्यांनी देशमुख यांच्या आईच्या गळय़ातील ८० हजार रूपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हातोहात लांबविली. अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.