India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशिक पोलिसांना मोठे यश! शहरातील अनेक घरफोडीचे गुन्हे उघडकीस; असा झाला पर्दाफाश

India Darpan by India Darpan
January 12, 2023
in क्राईम डायरी
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भरदिवसा अवघ्या पाच-दहा मिनिटांत घरफोडी करून पसार होणारा सराईत चोरट्यासह चोरीचा ऐवज विक्री करण्यास मदत करणाऱ्या त्याच्या दोन साथीदांरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने ही कारवाई केली. संशयितांच्या अटकेने विविध पोलिस ठाण्यात दाखल असलेले बारा गुन्हे उघडकीस आले असून, त्यांच्या ताब्यातून लाखोंचा ऐवज हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी दिली.

शहानवाज उर्फ बरग्या अन्वर खान (वय ४०, रा. गुलशननगर, वडाळागाव) असे या सराईत आरोपीचे नाव आहे. त्याने चोरलेले ऐवज विक्री करण्यासाठी मदत करणाºया मनोज उर्फ बाळा त्र्यंबक गांगुर्डे (वय ३०, रा. गोपाळकृष्ण चौक, भुजबळ फार्म जवळ, जुने सिडको) आणि पवन रविंद्र कुलकर्णी (वय ३८, रा. हनुमान चौक, राणाप्रताप चौक, सिडको) यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. शहानवाज हा सराईत गुन्हेगार असून २०१५-१६ मध्ये देखील त्याच्यावर आठ गुन्हे दाखल आहेत. परंतू त्यानंतर तो शहर सोडून गेला होता. करोना काळानंतर तो पुन्हा शहरात परतला. तो एका भंगार विक्रेत्याकडे कामास आहे. कमी सदनिका असलेल्या इमारतीमधील बंद घरांची टेहळणी करून अवघ्या काही मिनटात घरफोडी करून पसार होण्यात तो माहिर असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे.

मुबंई नाका पोलिस ठाणे हद्दीतील वडाळा रोडवरील फातेमा टॉवर इमारतीत वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १ जानेवारी रोजी घरफोडी झाली होती. या घरफोडीत ३ लाख ३४ हजार रुपये किंमतीचे सोने चांदीचे दागिने चोरीस गेले होते. पहिल्याच दिवशी भरदिवसा चोरट्याने आवाहन दिल्याने पोलिस यंत्रणा कामाला लागली होती. मुंबईनाका पोलिसांबरोबरच शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे निरीक्षक विजय ढमाळ यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून शोध सुरू केला होता. युनिटचे पोलिस कर्मचारी प्रदीप म्हसदे, प्रवीण वाघमारे आणि मुक्तार शेख आदींनी फुटेज बघत असतांना आरोपींची ओळख पटविली. पथकाने तात्काळ त्याचा शोध घेतला असता तो आपल्या साथीदारांसह अजमेर येथे गेला असून शनिवारी (दि.७) ते नाशकात परणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

संशयित नाशकात येणार असल्याची माहिती प्राप्त होताच पथकाने सापळा लावून या त्रिकुटास जेरबंद केले. शहानवाज याने चोरी केलेले दागिने आरोपी मनोज गांगुर्डे आणि पवन कुलकर्णी हे कुटुंबांतील महिला सदस्यांच्या मदतीने सराफ व्यावसायिकांना विक्री करीत असल्याचे तपासात समोर आले आहे. फातेमा टॉवर इमारतीतील केलेल्या घरफोडीतील १११.७९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. याशिवाय मुंबई नाका आठ व इंदिरानगर भागात चार अशा १२ गुन्ह्यांची कबूली संशयितांनी दिली असून त्यांच्या ताब्यातून ११ लाख ७० हजार ७५८ रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. हि कारवाई उपनिरीक्षक विष्णू उगले, हवालदार रविंद्र बागुल, आसिफ तांबोळी, प्रशांत मरकड, विशाल देवरे, मुक्तार शेख व अण्णासाहेब गुंजाळ आदींच्या पथकाने केली.

Nashik Crime Dacoity Police Investigation Detection


Previous Post

चोरटेही संतूर साबणाच्या प्रेमात! अख्खा ट्रकच केला गायब

Next Post

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शुक्रवार – १३ जानेवारी २०२३

Next Post

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस - शुक्रवार - १३ जानेवारी २०२३

ताज्या बातम्या

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी राज्यात कुठे किती मतदान? बघा, आकडेवारी

January 30, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

धरणामध्ये आंघोळीला गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

January 30, 2023

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

January 30, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज अति घाई करु नाही; जाणून घ्या, मंगळवार, ३१ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

January 30, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – ३१ जानेवारी २०२३

January 30, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – हस्तरेषा ज्ञान

January 30, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group