India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास विशेष पोस्को न्यायालयाने दिली ही शिक्षा

India Darpan by India Darpan
January 21, 2023
in क्राईम डायरी
0

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शाळकरी मुलीसोबत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी विशेष पोस्को न्यायालयाने एकास दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. दानिश अक्रम खान (२९ रा.रेहमतनगर वडाळागाव) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हा खटला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय तथा विशेष पोक्सो न्यायालयाचे न्या. एस.एस.खरात यांच्या कोर्टात चालला.

सहाय्यक सरकारी अभियोक्ता एस.एस गोरे यांनी या खटल्याचे कामकाज पाहिले. ही घटना डीजीपीनगर भागात ९ ऑक्टोबर २०२१ रोजी घडली होती. आरोपीने मुलीस चारचाकीतून लॉजवर घेवून जात हे कृत्य केले होते. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात विनयभंग,अपहरणासह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी व पीडिता एकमेकांचे परिचीत आहेत. पीडितेचा अज्ञानपणाचा फायदा उचलत आरोपीने हे कृत्य केले होते. ९ ऑक्टोबर रोजी मुलीची शाळा गाठत त्याने वडिलांनी घरी बोलावल्याचे खोटे सांगत मुलीस आपल्या चारचाकीतून एका लॉजवर नेले होते.

एका रूममध्ये तिचा विनयभंग केला होता. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपनिरीक्षक अंकुश जाधव यांनी या गुन्ह्याचा तपास करून पुराव्यानिशी दोषारोपपत्र न्यायालयास सादर केले होते. फिर्यादी,साक्षीदार व पंच यांनी दिलेली साक्ष आणि तपासी अधिका-यांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत आरोपीस ही शिक्षा सुनावली.

Nashik Crime Court Sexual Abuse Sentence


Previous Post

गोंडपिपरी तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या विषबाधा प्रकरणी चौकशीचे आदेश

Next Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – लग्नानंतरचा पहिला वाढदिवस

Next Post

इंडिया दर्पण - हास्य षटकार - लग्नानंतरचा पहिला वाढदिवस

ताज्या बातम्या

दरमहा १ हजार रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल ५० लाख रुपये! कोणती आहे ही छप्पर फाडके स्कीम?

January 28, 2023

प्रमाणापेक्षा जास्त टाइट ड्रेस घालणे उर्वशी रौतेलाच्या अंगलट; सोशल मिडियात ट्रोल (व्हिडिओ)

January 28, 2023

येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार हा मोठा बदल; शिक्षण मंत्र्यांची माहिती

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारतात कोरोनाची नवी लाट येणार का? धोका टळला आहे का? तज्ज्ञ म्हणतात…

January 28, 2023

या कारणास्तव कोर्टाने पतीला दिला घटस्फोट; पत्नीबाबत कोर्ट म्हणाले…

January 28, 2023

जावई माझा भला! सासूने चार दिवस राबून बनवले तब्बल १७३ पक्वान्न; चर्चा तर होणारच

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group