India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

वासनांध हर्षल मोरेच्या गैरकृत्याचे अनेक साक्षीदार; आणखी अनेक बाबी उघड होणार

India Darpan by India Darpan
December 9, 2022
in स्थानिक बातम्या
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बहुचर्चित म्हसरूळ येथील विद्यार्थीनी लैंगिक शोषण प्रकरणात कारागृहात रवानगी करण्यात आलेल्या हर्षल मोरे याचा पुन्हा म्हसरूळ पोलिसांनी ताबा घेतला असून, त्यास दुसऱ्या गुन्ह्यात बुधवार (दि.१४) पर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. पहिल्या गुह्याच्या तपासात त्याच्या घरात मिळून आलेल्या एअर गनचा धाक दाखवत त्याने हे कृत्य केल्याचा पोलिसांना संशय असून, त्याबाबतच्या तपासासाठी त्यास पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

म्हसरूळ येथील द किंग फाऊंडेशन संचलित गुरुकूल आधारश्रमातील लैंगिक शोषण प्रकरण गेल्या महिन्यात समोर आले आहे. एका पिडीतेने पोलिसात धाव घेतल्याने या प्रकरणात तब्बल सात अल्पवयीन विद्यार्थींनींचे संशयित संस्थाचालक हर्षल मोरे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकरणाचा उलगडा झाला आहे. याप्रकरणी वेगवेगळे सात गुन्हे दाखल करण्यात आले असून पहिल्या गुन्ह्यात पोलिसांनी चौदा दिवसांच्या कोठडीत मोरे याच्या कृरकृत्याचा भांडाफोड केला. या काळात पोलिसांनी त्याच्यासह ज्ञानदीप गुरूकुल आश्रमाच्या विश्वस्तांची कसून चौकशी केली आहे. मोरे याच्या शहरातील आणि मूळ गाव असलेल्या सटाणा येथील घरझडतींसह पीडिता आणि नातेवाईकांची जबाब नोंदविले आहे.

सटाणा येथील घरझडतीत पोलिसांच्या हाती एअर गन लागली आहे. मात्र तत्पूर्वीच कोर्टाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यास कारागृहात रवाना करण्यात आले होते. परंतू पोलिसांनी बुधवारी (दि.७) पुन्हा त्याचा ताबा घेतला आहे. या गनचा धाक दाखवित त्याने पिडीतांवर बलात्कार केल्याचा संशय पोलिसांना असून त्याबाबत आज न्यायालयात बाजू मांडण्यात आली. सरकारी वकील अ‍ॅड सुधीर कोतवाल यांनी संशयित मोरेच्या राहत्या घरी एअरगन मिळाली असून, त्याचा धाक दाखवून त्याने विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याचा संशय आहे. त्याकामी पोलिसांना अधिक चौकशी व सखोल तपास करायचा असल्याचे तसेच या प्रकरणात अनेक साक्षीदार समोर येत असल्याचा युक्तीवाद केल्याने न्यायालयाने संशयितास पुन्हा सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Nashik Crime Adharashram Accused Harshal More Investigation
Police Rape Molestation Minor Girls


Previous Post

हातगाडीवर अश्लिल सीडी विक्री करणाऱ्यास न्यायालयाने ठोठावली ही शिक्षा

Next Post

भद्रकालीतील ‘त्या’ कुंटणखान्याच्या जागेबाबत नाशिक पोलिस आयुक्तांनी घेतला हा निर्णय

Next Post

भद्रकालीतील 'त्या' कुंटणखान्याच्या जागेबाबत नाशिक पोलिस आयुक्तांनी घेतला हा निर्णय

ताज्या बातम्या

दोन मजली बिल्डींग चक्क उचलून नऊ फूट मागे सरकवली; कसं काय? पुण्यातील अनोख्या प्रयोगाची सर्वत्र चर्चा (व्हिडिओ)

March 22, 2023
प्रातिनिधिक फोटो

बँकेत पैसे भरण्यासाठी रांगेत उभे असतांना वृध्द महिलेची पर्स उघडून चोरट्यांनी एक लाख रुपये केले लंपास

March 22, 2023
प्रातिनिधिक फोटो

कोयत्याचा धाक दाखवत दहशत निर्माण करणा-याला पोलिसांनी केले गजाआड

March 22, 2023

नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानाच्यावतीने नाशकात स्वागत यात्रा, मिरवणूक

March 22, 2023

राजधानीत गुढीपाडवा साजरा; सिन्नर तालुक्यातील बाल वारकऱ्यांच्या अभंगातून सारेच थक्क

March 22, 2023

हज यात्रेच्या नावाखाली आर्थिक फसवणूक; चार जणांविरूध्द गुन्हा दाखल

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group