नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चंदवडच्या कोषागार कार्यालयातील उपकोषागार अधिकारी सुनिल सुभान तडवी यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे. थकीत वेतनाचे बील मंजूर करण्यासाठी तडवी याने १५ हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडी अंती त्याने १० हजार रुपयांची लाच स्विकारणारली. आता त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तडवी हा चांदवडच्या कोषागार कार्यालयात उपकोषागार अधिकारी (वर्ग २) आहे. तडवी याने थकीत वेतनाचे बिल मंजूर करण्यासाठी व कोणतेही आक्षेप न घेण्याच्या मोबदल्यात १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडी अंती ही रक्कम १० हजार रुपये निश्चित करण्यात आली. त्यानंतर याप्रकरणी नाशिक एसीबीकडे तक्रार करण्यात आली. त्याची दखल घेत एसीबीने सापळा रचला. तडवी याने १० हजार रुपयांची लाच स्वीकारली आणि त्याचक्षणी एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. याप्रकरणी त़डवी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, त्याची कसून चौकशी सुरू आहे.
एसीबीने आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करणे गुन्हा आहे. यासंदर्भात अँन्टी करप्शन ब्युरोच्या १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Nashik Crime ACB Raid Bribe Corruption Chandwad Officer