इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक तालुक्यातील सय्यद पिंपरी येथील १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा ३० वर्षीय नराधम सूरज कालू गाडर (रा.मांजरपाडा तालुका पेठ) यांस जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती मलकलपट्टे रेड्डी यांनी वीस वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने साधी कैद तसेच भादंवि कलम ५०६ अन्वये २ वर्षे सक्त मजुरी अशी शिक्षा ठोठावली आहे.
सूरज कालू गाडर यास पीडिता बारा वर्षाची अल्पवयीन मुलगी असल्याचे माहीत असतांनाही फिर्यादीचे झोपडीत व सय्यद पिंपरी येथील वनीकरणात तिच्यावर १० ऑक्टोबर २१ ते २५ एप्रिल २०२२ पर्यंत वेळोवेळी बळजबळीने जबरी लैंगिक अत्याचार केला. तसेच पालकांना सांगितले तर तुला मारून टाकेल? असा दम देऊन वेळोवेळी शाऱीरिक संबंध ठेऊन तिला गर्भवती केले व बाळाच्या जन्मास कारणीभूत ठरल्याने त्याच्याविरुद्ध जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती रेड्डी यांच्या न्यायालयात पा.ह.वि.क ३७६(३),५०६ तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासुन संरक्षण सन २०१२चे पोक्सो कलम ४,६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा तपास नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीमती सारिका आहिरराव यांनी केला व आरोपीविरुध्द भक्कम पुरावा गोळा केला व जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होता. त्याच्याविरुद्धचा गुन्हा न्यायालयात साबित झाला व न्यायमूर्तींनी वरील प्रमाणे निकाल दिला.
सदर खटल्यात सरकारी अभियोक्ता श्रीमती सुलभा सांगळे यांनी फिर्यादीतर्फे युक्तीवाद केला पोलीस अधिक्षक विक्रम देशमाने,अप्पर पोलीस अधिक्षक गिरडोलकर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. पैरवी अधिकारी म्हणुन हवालदार आगोणे व सहाय्य्क पोलीस उपनिरीक्षक भोये यांनी काम पाहिले.