India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशकात आत्महत्येचे सत्र सुरूच; शहराच्या वेगवेगळ्या भागात चौघांनी संपवले जीवन

India Darpan by India Darpan
January 23, 2023
in स्थानिक बातम्या
0

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. रविवारी (दि.२२) वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या चौघांनी आपले जीवन संपविले. त्यातील तिघांनी गळफास लावून घेत तर एका महिलेने स्व:तास पेटवून घेत आत्महत्या केली. चौघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड,सातपूर व नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिडकोतील शिवाजी चौक भागात राहणाºया राहूल उत्तमराव मोरे (४६ रा.सायखेडे हॉस्पिटल मागे,इंद्रनगरी) यांनी रविवारी शिवाजी चौकातील निसर्ग गार्डन रो हाऊस जवळील अनुदाप बंगल्याच्या स्टोअररूममध्ये अज्ञात कारणातून छताच्या लोखंडी पाईपाला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत सुहास महाले यांनी दिलेल्या खबरीवरून अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक आवारे करीत आहेत.

दुसरी घटना औद्योगीक वसाहतीत घडली. विनोद काशिनाथ बोरसे (३२ रा.श्रीजी हाईटस,श्रमिकनगर) यांनी रविवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच सतिश शेलार यांनी त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याच भागातील रेखाबाई राजेंद्र बागले (३८ रा.अंबिका स्विट मागे,अशोकनगर) यांनी गेल्या शुक्रवारी (दि.१३) सायंकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून स्व:ताच्या अंगावर ज्वलनशिल पदार्थ टाकून पेटवून घेतले होते. त्यात त्या ६० टक्के भाजल्याने मुलगा अक्षय बागले यांनी त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना रविवारी त्यांचा मृत्यू झाला. दोन्ही घटनांप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात वेगवेगळ््या मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या असून अधिक तपास हवालदार भड व हवालदार मुसळे करीत आहेत.

मंदा सुभाष सौदे (४० रा.वाल्मिक मंदिराजवळ,गायकवाड मळा गोरेवाडी) ही महिला रविवारी आयएसपी प्रेसच्या मोकळ््या आवारात चुल पेटविण्यासाठी सरपण घ्यायला गेली होती. अज्ञात कारणातून तिने प्रेस आवारातील बाभळीच्या झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या केली. सायंकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याबाबत पती सुभाष सौदे यांनी दिलेल्या खबरीवरून नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार शेख खरीत आहेत.

Nashik Crime 4 Peoples Suicide Incidence


Previous Post

नवी मुंबईत भारती विद्यापीठाच्या अत्याधुनिक मेडिकव्हर हॉस्पिटलचे उदघाटन

Next Post

या चार कंपन्यांची राज्यात होणारी गुंतवणूक परकीय; उद्योग मंत्री उदय सामंत यांचे स्पष्टीकरण

Next Post

या चार कंपन्यांची राज्यात होणारी गुंतवणूक परकीय; उद्योग मंत्री उदय सामंत यांचे स्पष्टीकरण

ताज्या बातम्या

अतिशय मानाचा आणि तब्बल १ लाख रुपयांचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांनी जाहीर

January 28, 2023

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचे काय चालले आहे माहित नाही – शरद पवार

January 28, 2023

मालेगाव येथे पठाण चित्रपट बघतांना चाहत्यांनी सिनेमागृहामध्येच केली फटाक्यांची अतिशबाजी (बघा व्हिडिओ)

January 28, 2023

ट्रॅक्टरने वाळू वाहतूक करण्यासाठी लाच; पोलिस अंमलदार व होमागार्ड एसीबीच्या जाळ्यात

January 28, 2023

मोदी सरकारचा मोठा निर्णय! राष्ट्रपती भवनातील या ऐतिहासिक गार्डनचे नाव बदलले

January 28, 2023

अतिशय गरीब घरातील या महिलेचा आवाज ऐका, तुम्हीही थक्क व्हाल! अभिनेता सोनू सूदने दिली ही मोठी ऑफर (व्हिडिओ)

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group