नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) नाशिक शहरात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पाथर्डी परिसरातील मंडळ अधिकारी (सर्कल ऑफिसर) आणि एका खासगी एजंटला ५० हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
नाशिक एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, पाथर्डी परिसराचा मंडळ अधिकारी पुरुषोत्तम दत्तात्रय पराडकर (वय ४०) आणि खासगी महिला एजंट केतकी किरण चाटोरकर (वय ४१ वर्षे, रा. चार्वाक नगर, इंदिरानगर) हे दोघे ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. एका अर्जदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी पराडकर आणि चाटोरकर यांनी तब्बल १ लाख रुपयांची मागणी केली. याप्रकरणी एसीबीकडे तक्रार करण्यात आली. एसीबीने सापळा रचला. १ लाख रुपयांच्या लाचेपोटी पहिल्या हफ्त्यात ५० हजार रुपयांची लाच घेताना पराडकर आणि चाटोरकर यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर आता एसीबीच्यावतीने दोघांवर गुन्हा दाखल करुन पुढील कार्यवाही सुरू आहे.
दरम्यान, लाच देणे आणि घेणे गुन्हा आहे. याप्रकरणी तक्रार करण्यासाठी १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे.
Nashik Corruption Bribe ACB Raid Circle Officer
Pathardi Agent Revenue Department