India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

संभाजी चौक ते त्रिमूर्ती चौक उड्डाणपूल होणार की नाही? मुंबई आयआयटीने दिला हा अहवाल

India Darpan by India Darpan
July 24, 2022
in स्थानिक बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात अत्यंत कळीचा ठरलेला संभाजी चौक ते त्रिमूर्ती चौक उड्डाणपूलाबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या उड्डाणपुलाला अनेकांनी विरोध केला. अत्यंत प्राचिन वृक्षाची तोड करावी लागणार असल्याने विरोधाची धार तीव्र होती. अखेर यासंदर्भात मुंबई आयआयटीला या संदर्भात अभ्यास करुन अहवाल देण्याचे नाशिक महापालिकेने सांगितले होते. अखेर आयआयटीने त्यांचा अहवाल सादर केला आहे.

नाशिक महानगरपालिकेतर्फे शहरातील संभाजी चौक, सिटी सेंटर मॉल ते त्रिमूर्ती चौक येथे उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला. काही स्थानिक नागरिकांनी त्यासाठी जोर लावला होता. नाशिककरांच्या कराच्या पैश्यातून तब्बल २५० कोटींची उधळपट्टी करून गरज नसताना पूल उभारणीच्या हट्टाविरोधात मनसेसह काही संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला होता. मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल केली होती. त्यातच आता आय.आय.टी. पवईने अहवाल सादर केला आहे. त्यात उड्डाणपूलाची गरज नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या प्रस्तावित उड्डाणपुलाला स्थानिक नागरिकांचा असलेल्या विरोधाच्या अनुषंगाने सदर उड्डाणपुल त्वरित रद्द करण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सातत्याने लढा दिला. अखेर या लढ्याला यश मिळाले आहे. मायको सर्कल पाठोपाठ त्रिमूर्ती चौकातील उड्डाणपूलांची गरज नसल्याच्या आय.आय.टी. पवईच्या अहवाला नंतर तत्कालीन मनपा आयुक्त रमेश पवार यांनी दोन्ही उड्डाणपूल रद्द करण्याचे आदेश दिले. शहराध्यक्ष दिलीप दातीर यांच्यासह मनसैनिकांनी याबद्दल महापालिकेचे आभार मानले आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्रिमूर्ती चौक येथे पेढे वाटप करून आनंद साजरा केला. या प्रसंगी मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर, उपजिल्हाध्यक्ष नामदेव पाटील, सिडको विभाग अध्यक्ष-नितीन माळी, बबन जगताप , महिला सेनेच्या कामिनीताई दोंदे,अरुणाताई पाटील, निर्मलाताई पवार,भाग्यश्रीताई ओझा, गौतम पराडे,सचिन कामानकर ,सचिन रोजेकर, राहुल पाटील, मनोज जैन ,अजिंक्य शिर्के, पंकज दातीर, गोपी पगार, गोपी गांगुर्डे, शुभम थोरात, सचिन ओझा, समाधान चव्हाण, गणेश दातीर, व सर्व पदाधिकारी ,सर्व भाजी विक्रेते, व्यावसायिक व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते…

Nashik City Sambhaji Chauk Trimurti Chauk Flyover Munbai IIT Report


Previous Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ३० जूलैला नाशिक दौ-यावर; माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती

Next Post

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – २५ जुलै २०२२

Next Post

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस - २५ जुलै २०२२

ताज्या बातम्या

प्रातिनिधिक फोटो

४५ वर्षाची मामी आणि २४ वर्षाचा भाचा.. दोघांचे प्रेमसंबंध… त्यानंतर असं घडलं की पोलिसही झाले अवाक…

April 2, 2023

हाय रे देवा… कांद्याला मिळाला २५ पैसे प्रतिकिलो भाव… शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू… दिवसेंदिवस परिस्थिती बिकट…

April 2, 2023

मालेगावात गजबजलेल्या ठिकाणावरुन दुचाकी चोरीला; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद (व्हिडिओ)

April 2, 2023

दंगलींमध्ये राज्य सरकारचाच सहभाग… आमचा मार्ग अडविण्यासाठीच दंगल… संजय राऊतांचा हल्लाबोल

April 2, 2023

बागेश्वर बाबांचे साईबाबांविषयी वादग्रस्त विधान… भाविकांमध्ये असंतोष… बघा काय म्हणाले ते…

April 2, 2023

सावधान! ठाण्यातील मुंब्रा बायपास बंद; नाशिकसह अन्य शहरांना जाणाऱ्या वाहतुकीला फटका… हे आहेत पर्यायी मार्ग

April 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group