कोविड फ्रंट लाईन’चे प्रशिक्षण नोकरीची हमी देणारे –खासदार गोडसे
नाशिक : महात्मा फुले शैक्षणिक सेवा गेल्या वीस वर्षांपासून कार्यरत असून नुकताच त्यांनी पंतप्रधान कौशल्य विकास योजनेंतर्गत ‘कोविड फ्रट लाईन’ वारियर हा कोर्स सुरु केला आहे. सदर कोर्स पुर्णत: मोफत असून कोर्स अवघ्या २१ दिवसांत पूर्ण होणार आहे. प्रशिक्षण घेतलेल्या युवक – युवतींना लगेचच नोकरीचे प्रशिक्षण आणि विविध खाजगी रुग्णालयांमध्ये नोकरी उपलब्ध करुन दिली जाणार असल्याने युवक – युवतींसाठी ही एक मोठी संधी आहे. महात्मा फुले शिक्षण संस्थेने आयोजित केलेला कोविड फ्रट लाईन वॉरियर हा कोर्स नोकरीची हमी देणारा आहे, असे प्रतिपादन खासदार हेमंत गोडसे यांनी केले आहे.
महात्मा फुले शिक्षण संस्थेने वडाळा – पाथर्डी रोड परिसरातील विनयनगर येथील संस्थेच्या कार्यालयात ‘कोविड फ्रट लाईन’ वारियर या कोर्सचे आयोजन केले आहे. या कोर्सचे उद्घाटन आज खा. गोडसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कौशल्य विकास योजनेच्या मुख्य अधिकारी अनिसा तडवी, संस्थेचे संस्थापक मकरंद बागुल, संस्थेच्या अध्यक्षा संगिता बागुल आदी मान्यवर उपस्थित होते. कोविड फ्रट लाईन वारियर हा कोर्स अवघ्या २१ दिवसांचा आहे. कोर्स पूर्ण झाल्यावर प्रशिक्षणार्थींना दोन महिन्याचे नोकरीचे ट्रेनिंग दिले जाते. त्यानंतर प्रशिक्षणार्थींना पंतप्रधान कौशल्य विकास योजनेंतर्गत विशेष प्रमाणपत्र दिले जाते. ट्रेनिंग आणि जॉब ट्रेनिंग होताच प्रशिक्षणार्थींना लगेचच शहरातील विविध रुग्णालयांमध्ये नोकरी उपलब्ध करुन दिली जाते. हा संपूर्ण कोर्स मोफत असून प्रशिक्षणार्थींचा दोन लाख रुपयांचा विमा देखील उतरविला जातो. महात्मा फुले शिक्षण संस्थेने सुरु केलेला कोविड फ्रट लाईन वारियर हा कोर्स बेरोजगारांसाठी उत्तम असून केंद्र शासनाच्या या योजनेचा गरजू युवक युवतींनी अवश्यक लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार गोडसे यांनी यावेळी केले आहे.