नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मद्याच्या नशेत पडल्याने ४७ वर्षीय व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. महिनाभर त्याच्यावर उपचार सुरु होते. सतिष सायना निंबाळकर (रा.आर.पी.विद्यालयाजवळ,संजयनगर) असे मृत इसमाचे नाव आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
निंबाळकर यांना दारूचे व्यसन होते. गेल्या २४ जानेवारी रोजी ते मद्याच्या नशेत असतांना आपल्या घराजवळच पडला होता. या घटनेत त्यांच्या डोक्यास वर्मी मार लागल्याने जुना आडगाव नाका येथील सुधर्म हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. अधिक उपचारार्थ आडगाव मेडिकल कॉलेज येथे त्यांना दाखल करण्यात आले असता महिनाभराच्या उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबत डॉ.आर.जे.शिरोळे यांनी दिलेल्या खबरीवरून पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार घुगे करीत आहेत.