India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशिकच्या समतानगरमध्ये मोठा अनर्थ टळला; महिलेचे घर व दुचाकी पेटवली

India Darpan by India Darpan
January 17, 2023
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – समतानगर भागात पूर्व वैमनस्यातून एकाने महिलेचे घर व दुचाकी पेटवून दिल्याची घटना घडली. पंकज मोरे असे महिलेचे घर पेटवून देणा-या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी सुशिला प्रेम चव्हाण (रा.सोनवणे बाबा चौक. समतानगर ) यांनी तक्रार दाखल केली असून उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित आणि महिला एकाच भागात राहणारे असून त्यांच्या पूर्ववैमनस्य आहे. रविवारी (दि.१५) रात्री संशयिताने मागील वादाची कुरापत काढून तिला शिवीगाळ व दमदाटी केली होती. त्यानंतर या वादावर पडदा पडला असता संशयिताने मध्यरात्री महिलेचे घर नष्ट करण्याच्या उद्देशाने पार्क केलेली एमएच १५ एच पी ६३७४ या दुचाकीवर आणि घराच्या पत्र्यावर ज्वलनशिल पदार्थ टाकून पेटवून दिले. ही बाब निदर्शनास येताच स्थानिकांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविल्याने अनर्थ टळला. या घटनेत दुचाकीसह घरावरील प्लॅस्टिक पत्रे तसेच टाटा स्काय डिश जळून खाक झाली. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.


Previous Post

विधान परिषद निवडणूक : महाविकास आघाडीत बिघाडी; नागपुरात ३ तर औरंगाबादमध्ये २ उमेदवार, खरा कोण?

Next Post

भरधाव वाहनाने कट मारल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

Next Post
प्रातिनिधीक फोटो

भरधाव वाहनाने कट मारल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

ताज्या बातम्या

फलटण-पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठी राज्य सरकार देणार ९२१ कोटी रुपये

February 1, 2023
संग्रहित छायाचित्र

आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गाबाबत झाले हे महत्त्वाचे निर्णय; पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

February 1, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

बाल संगोपन परिपोषण अनुदानात भरीव वाढ; राज्यातील ५४ हजार लाभार्थ्यांना मिळणार एवढे पैसे

February 1, 2023

कोकणातील आंगणेवाडी यात्रेला जाणाऱ्यांना मोठा दिलासा; यंदा मिळणार या सर्व सुविधा

February 1, 2023

गाईसाठी ७० हजार रुपये… म्हशीसाठी ८० हजार रुपये… राज्य सरकारने केली खरेदी किंमतीत वाढ 

February 1, 2023

ही पदे स्थानिक आदिवासींमधून भरण्याचा निर्णय; युवक युवतींना मिळणार रोजगाराची संधी

February 1, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group