India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नॉयलॉन मांजा विक्री करणा-या चार जणांवर कारवाई; २१ हजाराचा नॉयलान मांजा जप्त

India Darpan by India Darpan
January 14, 2023
in क्राईम डायरी
0

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील नॉयलॉन मांजा विक्रेत्यांवर पोलिसांनी शुक्रवारी वेगवेगळय़ा भागात टाकलेल्या छापासत्र चार जणांवर कारवाई करुन २१ हजार रूपये किमतीचा नॉयलान मांजा जप्त केला. याप्रकरणी आडगाव, गंगापूर, उपनगर व पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली कारवाई जेलरोड भागात करण्यात आली. हर्षल शत्रुघ्न कर्डक (१९ रा. प्राईड लिला अपा.भिमनगर) हा युवक आपल्या घर परिसरात नॉयलॉन मांजा विक्री करतांना आढळून आला. संशयिताच्या ताब्यातून १ हजार २०० रूपये किमतीचा मांजा जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी पोलिस शिपाई राहूल जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास जमादार गांगुर्डे करीत आहेत. तर दुसरी कारवाई गंगाघाट भागात करण्यात आली. येथे विकास राजेश हळोदीया (२५ रा.सातभाई नगर,जेलरोड) हा युवक शुक्रवारी दुपारच्या सुमारास गंगाघाटावरील यशवंतराव पटांगणात बेकायदा नॉयलॉन मांजा विक्री करतांना मिळून आला. त्याच्या ताब्यातून सुमारे नऊ हजार रूपये किमतीचे १८ गट्टू जप्त करण्यात आले असून संशयितास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई गोरक्ष साबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक डि. पी. नाईक करीत आहेत. तिसरी कारवाई बळी मंदिर चौक ते बळी महाराज टी स्टॉल दुकानाकडे जाणा-या मार्गावर करण्यात आली. येथे तनिश सुनिल ताडे (१८ रा.वृंदावन कॉलनी,अमृतधाम) हा युवक गुरूवारी रात्री नॉयलॉन मांजा विक्री करतांना मिळून आला. संशयिताच्या ताब्यातून तीन हजार रूपये किमतीचे पाच रिळ हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी पोलिस नाईक दादासाहेब वाघ यांनी दिलेल्या तक्रारीवरून आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार नरवडे करीत आहेत. चौथी कारवाई सावरकरनगर भागात करण्यात आली. हितेश परशुराम चव्हाण (२२ रा.सातपूर कॉलनी) हा युवक शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास सावरकर नगर येथील गॅलेक्सी क्रिकेट टर्फ समोर नॉयलॉन मांजा विक्री करतांना मिळून आला. त्याच्या ताब्यातून सात हजार ८०० रूपये किमतीचा नॉयलॉन मांजा जप्त करण्यात आला असून याप्रकरणी अंमलदार वाघचौरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक परदेशी करीत आहेत.


Previous Post

महिला व्यावसायीकाच्या नावाने फायनान्स कंपनीकडून परस्पर कर्ज काढणा-या विरुध्द गुन्हा दाखल

Next Post

राज्यात आता राबविणार हे अभियान; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Next Post

राज्यात आता राबविणार हे अभियान; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

January 28, 2023

दरमहा १ हजार रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल ५० लाख रुपये! कोणती आहे ही छप्पर फाडके स्कीम?

January 28, 2023

प्रमाणापेक्षा जास्त टाइट ड्रेस घालणे उर्वशी रौतेलाच्या अंगलट; सोशल मिडियात ट्रोल (व्हिडिओ)

January 28, 2023

येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार हा मोठा बदल; शिक्षण मंत्र्यांची माहिती

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारतात कोरोनाची नवी लाट येणार का? धोका टळला आहे का? तज्ज्ञ म्हणतात…

January 28, 2023

या कारणास्तव कोर्टाने पतीला दिला घटस्फोट; पत्नीबाबत कोर्ट म्हणाले…

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group