नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महापालिकेच्या सिटी लिंक बसची वाट अडवित चालकास शिवागाळ करुन बसवर दगडफेक फेकणा-याला पोलिसांनी गजाआड केले आहे. अतूल महादू देवरे (रा.सावता नगर,सिडको) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
याप्रकरणी महापालिकेच्या सिटी लिंक बसवरील चालक सचिन दिलीप गायकवाड (रा.खोले मळा आर्टीलरी सेंटर रोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल असून अंबड पोलिस ठाण्यात सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीसह विवीध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालक गायकवाड व वाबक राहूल दराडे हे दोघे मंगळवारी (दि.१०) एमएच १५ जीव्ही ७७४८ या सिम्बॉयसेस कॉलेज ते नाशिकरोड सिटीबसवर सेवा बजावत असतांना ही घटना घडली. सिडकोतील सावता नगर भागातून प्रवासी भरून बस नाशिकरोडच्या दिशेने निघाली असता संशयिताने थांब्यावरच बसची वाट अडवित चालकास शिवीगाळ केली. यावेळी संतप्त संशयिताने थेट दगड उचलून बसच्या पुढील काचेवर मारून फेकला. या घटनेत बसची काच फुटल्याने नुकसान झाले असून संशयितास पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. अधिक तपास पोलिस नाईक बनतोडे करीत आहेत.