India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार; गुन्हा दाखल

India Darpan by India Darpan
January 5, 2023
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लग्नाचे आमिष दाखवून एकाने तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात बलात्कार, अनैसर्गिक कृत्य आणि अ‍ॅट्रोसिटी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोहेब जाफर खान (२५ रा.हरी किरण अपा.विहीतगाव) असे संशयिताचे नाव आहे. अश्लिल व्हिडीओ सोशल मिडीया व्हायरल करण्याची धमकी देऊन गर्भपात करण्यास भाग पाडल्याने युवतीने पोलिस स्थानकात तक्रार केली. याप्रकरणी संशयित आणि पीडिता एकाच भागातील रहिवासी आहेत. अनुसूचित जाती जमातीच्या पीडितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, नोव्हेंबर २०२० मध्ये संशयिताशी ओळख झाली. संशयिताने पाठलाग करीत लग्नाचे आमिष दाखविल्याने या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यामुळे दोघांमध्ये भेटीगाठी होत होत्या. मुलीने विश्वास ठेवल्याने संशयिताने तिला आपल्या घरात व सोसायटीच्या आवारात बोलावून घेत वेळोवेळी बळजबरीने बलात्कार केला. यावेळी त्याने अनैसर्गिक कृत्याचे अश्लिल फोटो व व्हिडीओही काढला. कालांतराने तरूणी दोन वेळा गर्भवती राहिली असता संशयिताने तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. गर्भपात करण्यास मुलीने विरोध केला असता संशयिताने अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत गर्भनिरोधक गोळय़ा बळजबरीने घेण्यास भाग पाडून गर्भपात केल्याचा आरोप युवतीने केला आहे. अधिक तपास सहाय्यक आयुक्त सिध्देश्वर धुमाळ करीत आहेत.


Previous Post

अपघाताचे सत्र सुरुच; दोन अपघातामध्ये दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू

Next Post

पत्नीस शिव्या देणे पडले महागात; गैरसमजातून शेजा-याने पतीस केली बेदम मारहाण

Next Post
प्रातिनिधीक फोटो

पत्नीस शिव्या देणे पडले महागात; गैरसमजातून शेजा-याने पतीस केली बेदम मारहाण

ताज्या बातम्या

नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानाच्यावतीने नाशकात स्वागत यात्रा, मिरवणूक

March 22, 2023

राजधानीत गुढीपाडवा साजरा; सिन्नर तालुक्यातील बाल वारकऱ्यांच्या अभंगातून सारेच थक्क

March 22, 2023

हज यात्रेच्या नावाखाली आर्थिक फसवणूक; चार जणांविरूध्द गुन्हा दाखल

March 22, 2023

नंदुरबार जिल्ह्यात शेतपिकांची पाहणी केल्यानंतर कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले…

March 22, 2023

या अनोख्या एटीममधून मिळते कापडी पिशवी; विटा नगरपरिषदेचा अनोखा उपक्रम

March 22, 2023
प्रातिनिधिक फोटो

सावरकरनगरचे न्यू टकले ज्वेलर्स शोरूम फोडले; २६ लाखाचे अलंकार लंपास

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group