नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महामार्गावरील जत्रा हॉटेल जवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. गेल्या पंधरा दिवस जखमीवर उपचार सुरू होते. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गणेश अशोक पाटेकर (४२ रा.सय्यद पिंप्री ता.जि.नाशिक) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. पाटेकर गेल्या १६ डिसेंबर रोजी रात्री साडे वाजेच्या सुमारास शहरातून सय्यद पिंप्रीच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. भरधाव अज्ञात वाहणाने दुचाकीस धडक दिल्याने पाटेकर गंभीर जखमी झाले होते. कुटुंबियांनी त्यांना लोकमान्य हॉस्पिटल येथे प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ आडगाव येथील मेडिकल कॉलेज मध्ये दाखल केले होते. रविवारी (दि.१) उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी त्यांना मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार डापसे करीत आहेत.