नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दोन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या ३५ वर्षीय युवकाचा मृतदेह गोदापात्रात आढळला आहे. राधेश्याम टिकमदास वैष्णव (३६, रा. अंकुर हॉस्पिटलसमोर, कामटवाडे, सिडको) असे मयत तरुणाचे नाव आहे. वैष्णव याने उडी घेत आत्महत्त्या केल्याचे बोलले जात आहे. राधेश्याम यांच्या मागे वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राधेश्याम हा गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होता. याची नोंद अंबड पोलिस ठाण्यामध्ये करण्यात आलेली होती. गुरुवारी (दि २२) गंगापूर रोड परिसरातील शहीद चित्ते पुलाजवळ गोदापात्रामध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळून आला. त्यानंतर गंगापूर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदन अहवालानुसार, राधेश्याम यांचा मृत्यु पाण्यात बुडून झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी गंगापूर रोड पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.