नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– जुने सिबीएस बसस्टॅण्ड आवारात बसमध्ये चढतांना गर्दीची संधी साधत भामट्यांनी महिलेच्या बॅगची चैन उघडून पर्स लंपास केली. या पर्समध्ये सोन्याचांदीच्या दागिण्यांसह मोबाईल असा सुमारे ६० हजाराचा ऐवज होता. मंदाबाई मोहन आहेर (रा.साक्री जि.धुळे) यांनी याबाबत तक्रार दाखल केली असून सरकारवाडा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आहेर शहरातील नातेवाईकांकडे आल्या होत्या. सोमवारी (दि.१२) दुपारच्या सुमारास त्या परतीच्या प्रवासासाठी सीबीएस बसस्थानक आवारात आल्या असता ही घटना घडली. धुळे बसमध्ये त्या चढत असतांना गर्दीची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बॅगेची चैन उघडून पर्स चोरून नेली. यापर्समध्ये सोनसाखळी मंगळसुत्र व मोबाईल असा सुमारे ६० हजाराचा ऐवज होता. अधिक तपास पोलिस नाईक साबळे करीत आहेत.