नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सारडा सर्कल भागात रस्त्याने पायी जात असतांना चक्कर येवून पडल्याने ३६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. कुमार हेमराज विधाते (३६ रा.साईहरी संकुल,मायको सर्कल शरणपूररोड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.विधाते सोमवारी (दि.१२) दुपारी दोन वाजेच्या सुमारास सारडा सर्कल भागातून रस्त्याने पायी जात असतांना ही घटना घडली. सर्कल जवळून पायी जात असतांना अचानक चक्कर येवून तो जमिनीवर कोसळला होता. चुलत भाऊ नरेश वालेचा याने तात्काळ नजीकच्या खासगी रूग्णालयात दाखल केले असता डॉ.सचिन विभांडीक यांनी त्यास मृत घोषीत केले.याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.