नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उपनगर भागात बांधकाम साईटच्या तिस-या मजल्यावरून पडल्याने मजूराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. रविंद्र गुलाब खैरनार (रा.बालाजीनगर,मोरेमळा जेलरोड) असे मृत कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. खैरनार मंगळवारी (दि.६) उपनगर परिसरातील कदम लॉन्स भागात सुरू असलेल्या बांधकाम साईटवर काम करीत असतांना ही घटना घडली. तिस-या मजल्यावर ते काम करीत असतांना अचानक तोल गेल्याने ते जमिनीवर कोसळले होते. या घटनेत गंभीर दुखापत झाल्याने त्यांना बिटको रूग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार माळोदे करीत आहेत.