India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

टॅक्सी बुकींग पोलिस अधिकाऱ्याला महागात; तब्बल २२ हजारांना गंडा

India Darpan by India Darpan
December 6, 2022
in क्राईम डायरी
0

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ट्रॅव्हल्स कार बुकिंग करतांना पोलिस अधिकाऱ्याच्या बँक खात्यातील २२ हजार ७६५ रूपयांची रोकड परस्पर लांबविण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात फसवणूक आणि आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विकास दौलतराव वाघ यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. वाघ शहर पोलिस दलात निरीक्षकपदावर कार्यरत आहे. वाघ यांना गेल्या २५ ऑगष्ट रोजी मुंबई येथे जायचे होते. त्यामुळे त्यांनी मोबाईलच्या माध्यमातून ट्रॅव्हल्स कार बुकिंग करण्याचा प्रयत्न केला असता ही घटना घडली. भामट्यांनी संपर्क साधत वाघ यांना रेन्ट अ कार हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास भाग पाडले. यावेळी वाघ यांनी करून इंडियन ट्रॅव्हल्स आणि एचटीटीपी ट्रॅव्हल्स नेट या वेबसाईटचा शोध घेतला असता त्यात बँकेच्या डेबीट कार्ड नंबर मागण्यात आला.

वाघ यांनी वेबसाईटवर डेबीट कार्ड टाकला असता त्यांना ओटीपी नंबर आला. या ओटीपी नंबरचा त्यांनी वापर केला असता भामट्यांनी त्यांच्या बँक खात्यातील सुमारे २२ हजार ७६५ रूपयांची रक्कम परस्पर लांबविली. ही बाब लक्षात येताच वाघ यांनी बँकेशी संपर्क साधल्याने वेळीच व्यवहार थांबविण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला असून पोलिस अधिकाऱ्याच्या बाबतीत ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.


Previous Post

भाडेकरू कुंटुंबियांमधील वाद मिटवण्यासाठी गेलेल्या शेजा-याच्या डोक्यात मारला पेव्हर ब्लॉक

Next Post

कॉलेज परिसरात जुन्या वादातून टोळक्याने एका विद्यार्थ्यास केली बेदम मारहाण

Next Post
प्रातिनिधीक फोटो

कॉलेज परिसरात जुन्या वादातून टोळक्याने एका विद्यार्थ्यास केली बेदम मारहाण

ताज्या बातम्या

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी राज्यात कुठे किती मतदान? बघा, आकडेवारी

January 30, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

धरणामध्ये आंघोळीला गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

January 30, 2023

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

January 30, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज अति घाई करु नाही; जाणून घ्या, मंगळवार, ३१ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

January 30, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – ३१ जानेवारी २०२३

January 30, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – हस्तरेषा ज्ञान

January 30, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group