नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गंगापूररोडवरील मल्हारखान झोपडपट्टी परिसरात भरधाव मोटारसायकल दुभाजकावर आदळल्याने २९ वर्षीय दुचाकीस्वार तरूण ठार झाला. अजय कैलास ढगे (रा.शांतीनगर मखमलाबादरोड) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. ढगे रविवारी (दि.१३) रात्री आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. कॉलेजरोड येथून गंगापूररोडने तो अशोकस्तंभच्या दिशेने प्रवास करीत असतांना मल्हारखान झोपडपट्टी भागात भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळली. या अपघातात ढगे गंभीर जखमी झाल्याने सुनिल शिर्के यांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास सरकारवाडा पोलिस करीत आहेत.